blog

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ८

द्राक्ष शेती मध्ये  भविष्यात  माती चे आरोग्य शाश्वत व समृद्ध ठेवणे  हेच फार मोठे आव्हान असणार आहे. मागील भागात आपण  थोडक्यात पाहिले मातीचा पीएच व क्षारता वाढण्याची कारणे व द्राक्ष वेलीवर होणारा दुष्परिणाम काय होतो , यावर सद्ध्या तर एकच ऊपाय आहे तो म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब (ऑरगॅनिक कार्बन) वाढविने हाच आहे . माती परिक्षण अहवालामधे  सेंद्रिय कार्बन हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मानला जातो, मातीचा नमुना परिक्षण झाल्यानंतर सेंद्रिय कर्बाची वर्गवारी पुढील प्रमाणे केली जाते,  0 ते 0.30 - कमी, 0.30 ते 0.50 - मध्यम व 0.50 ते 1.0 चांगला, (अनेक कृषी तज्ञ व नामवंत अभ्यासक मंडळी सांगतात की  0.80 च्या आसपास सेंद्रिय कर्ब असेल तर ठिक आहे चांगला आहे)
काही  दिवसांपूर्वी एका गुजराती शेतकरी मित्राने त्याच्या शेतातल्या  मातीचा नमुना थेट अमेरिकेतील प्रख्यात मृदा प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवला. त्या अहवालामधे भारतीय शेतीसाठी सेंद्रिय कार्बन ची वर्गवारी अशी केली होती,  0.80 च्या खाली अत्यंत कमी- 0.80 ते 1.50 मध्यम व 1.50  ते 3.0 पासून पुडे ऊत्तम. आम्ही सेंद्रिय कार्बन ला का एवढे महत्व देत नाही याचच फार नवलही वाटत आहे वाईटही वाटत आहे, सेंद्रिय कार्बन चे महत्व आम्हाला चांगलेच माहीत आहे, परंतु  ही बाब  शेतकरीवर्गाने व शेतीतज्ञांकडून हवी तेवढी गांभिर्याने घेतली जात नाही, जमिनीची सुपिकताच मुळी सर्वस्वी सेंद्रिय कर्बावर अवलंबून आहे. जमिनीस भौतिक, रासायनिक व जैविक  गुणधर्म हे केवळ सेंद्रिय कर्बामुळे प्राप्त होतात. जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढल्याने सुपिकता आणि पिक उत्पादकता शाश्वत ठेवली जाते. जमिन ही भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांनी युक्त असे सजीव माध्यम आहे. अशी जमिन सर्वच वनस्पती ना आधाराबरोबरच योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी आणि आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करते, सेंद्रिय कार्बन चे  एवढ महत्व आम्हाला माहीत असुनही आमच्याकडे मात्र या बाबतीत फारच उदिसिनता पहायला मिळते, गेली तीन चार वर्षात द्राक्ष पिकविनार्या  विभागातील अनेक जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चक्क 0.30 च्या खाली  (जवळपास 50% जमिनी) आलेले आहेत, (हे फारच गंभिर आहे, वाळवंटाची व्याख्या करताना तज्ञ मंडळी सांगतात की ज्या जमिनीचा सेंद्रिय कार्बन 0.50 टक्के च्या खाली असल्यास  त्या जमिनीला वाळवंट म्हणतात ? ) आणि या विषयाशी अनभिज्ञ असनारे आमचे द्राक्ष बागाईतदार शेतकरी बंधू  प्रत्येक ऑक्टोबर छाटणी च्या पुर्वी  एका नव्या ऊमेदिने कामाला लागतात, चला आता या वर्षी तरी आपली द्राक्ष विक्रमी दर्जाची अन विक्रमी टनेजची निघतील. प्रत्येक शेतकरी बंधूने आता तरी कृषी साक्षर होणे गरजेचे आहे, मातीचा कस टिकवून ठेवण्यासाठी काय करावे लागेल ते केले पाहिजे, कारण माती समृद्ध असली तरच शेती टिकणार आहे व पिकणार आहे. माती च्या सेंद्रिय कार्बन वरच जमिनीचा जिवंतपणा अवलंबून आहे. सेंद्रिय कार्बन कमी होण्याचे एक मोठे कारण म्हणजे शेतीत सेंद्रिय निविष्ठांचा कमी वापर,  पिकांचे अवशेष नष्ट करने, अतिरिक्त नत्र युक्त खंताचा वारंवार वापर करणे विनाकारण जमिनीत अनेक प्रकारची घातक रसायने सोडने व विविध रसायनांमुळे प्रदुर्शित झालेले पाणी साठे हेच पाणी शेतीसाठी वापरले जाते, याच कारणांमुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस कमी होत आहे. हा सेंद्रिय कार्बन वाढवण्या साठी जमिनीमधे नियमित ऊत्तम कुजलेले शेनखत,  गांढूळ खत,हिरवळीची खते , जिवाणू खंतांचा वापर करावा लागेल.  पिकांच्या शिल्लक अवशेषांचा पुनर्वापर करावा लागेल तसेच जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांचा जमिनीवर आच्छादना साठी वापर करावा लागेल. जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय घटक असल्यास अशा जमिनीत विविध ऊपयोगी जिवाणू व गांढूळ संख्या वाढेल व जमिनी सतत  पोकळ व सछिद्र राहील, जमिनीत ऑक्सिजन व पाण्याचे समतोल प्रमाण ही रहाते, द्राक्ष वेलीची मुळे अश्या जमिनीत अफाट कार्यक्षम रहातात व अशीच सेंद्रिय कर्ब भरपूर असलेली जमिनच द्राक्ष वेलीच्या मुळावरील निगेटिव्ह चार्ज व पाॅजिटिव्ह चार्ज स्वतःच्या नियंत्रणात ठेवते, कोनत्या वेळी कोनता भार कमी वा जास्त ठेऊन वेलीस योग्य वेळी उत्पादना साठी सक्रिय करायचे हे फक्त सुपिक  जमिनीच्या च नियंत्रणात असते, म्हणून च या पुढे शाश्वत शेती टिकवण्या साठी " समृद्ध माती तरच शेती " ही संकल्पना राबवावी लागणार आहे. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्