blog

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ७

द्राक्ष बागेची ऑक्टोबर छाटणी पुर्वी माती परिक्षण करणे हे फार महत्वाचे असते, जमिनीत  असनार्या विविध घटकांचे प्रमाण समजू शकते, माती परिक्षण अहवाला मधे पहिला घटक जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक म्हणजेच पीएच,  ऊत्तम द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी जमिनीचा पीएच सहा ते  साडेसात च्या दरम्यान  (6-7.5) असावा, परंतु अलिकडे अनेक द्राक्ष जमिनी या जास्त पीएच ने ग्रासलेल्या पहायला मिळतात,  काही ठिकाणी तर चुनखडीचे प्रमाण  जास्त असलेल्या जमिनीतही द्राक्ष बागांच्या लागवडी केल्या गेल्या आहेत, अश्या जमिनीत साहजिकच चुन्याचे प्रमाण जास्त असते तेथिल माती अतिविम्ल  (अल्कली) प्रकारात मोडते अशा जमिनीचा पीएच साडेसात ते नऊ पर्यंत असतो,  अशा जमिनीत द्राक्ष वेलीची वाढ समाधान कारक होत नाही व पुढे घड फुगवन सुद्धा अपेक्षित होत नाही, अती चुना किंवा कॅल्शियम चे अती प्रमाण असलेल्या द्राक्ष मुळांवर (सुरवाती पासूनच)  निगेटिव्ह चार्ज कमी प्रमाणात असतो, साहजिकच अश्या जमिनीत बरिचशी अन्नद्रव्ये द्राक्ष वेल ऊचलु शकत नाही, गंधक , मॅग्नेशियम,  पोटॅशियम, फेरस सारखे घटक जास्त प्रमाणात देऊनही या घटकांची ऊचल (अपटेकिंग) होत नाही.   ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण बिलकुल नाही किंवा अत्यल्प आहे अशाही जमिनीचा पीएच वाढलेला आढळत आहे, याचे कारण अति क्षारयुक पाणी व गरजेपेक्षा जास्त प्रमाणात रसायनांचा वापर हेच आहे, अशा जमिनीत माती मध्ये सोडीयम, क्लोराईड, फ्लुओराईड्स, लेड, अर्सेनिक, मर्क्युरी,ब्रोमाईड, कॅल्शियम व नायट्रेट  सारखे अनेक घटक प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले आढळून येत आहेत, या दोन्ही प्रकारच्या जमिनीत मात्र पीएच  वाढलाच जातो,  (इंदापूर तालुक्यात एका द्राक्ष बागेत जमिनीचा प्रकार ऊत्तम असुनही (चुनखडी नसलेली) माती परिक्षणात मातीचा पीएच 10 आढळून आला? ) मग अश्या जमिनीमधे अनेक समश्या तयार होतात, अशा जमिनीत क्षारांचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाल्यामुळे तेथिल द्राक्ष वेलींच्या मुळांवर  निगेटिव्ह चार्ज गरजे पेक्षा जास्त वाढतो व जमिन चिकट व कडक बनते,  पीएच सुद्धा साडेसात च्या पुढे जातो एकूणच जमिनीचे आरोग्य बिघडते, जमिनीत कडकपणा व चिकटपणा वाढल्या मुळे तेथिल जमिनीचा पाण्याचा निचरा कमी होतो केवळ या कारणामुळे मातीत वाढलेले अतिरिक्त क्षार जमिनीच्या बाहेर पडत नाहीत, ज्या भागात थेट नदी किंवा कॅनाल चे पाणी शेतीसाठी वापरले जाते अशा जमिनीत पीएच प्रमाण वाढलेले निदर्शनास येत आहे,  महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नद्यातील पाणी प्रदुर्शीत झालेले  आहे. याच पाण्यातुन मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे रासायनिक क्षार जमिनी येत आहेत, अनेक  जमिनी तर क्षारपड (बरबाद) झाल्या आहेत , द्राक्ष वेल ही याच गुंत्यात अडकत चालली आहे, परंतु कितीही किचकट गुंता असला तरीही तो गुंता सोडवण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नसनार आहे. एखादा महामार्ग जर छराब झाला असेल त्यावर खुपच खड्डे पडले असतील तर तात्पुरते दुसर्या मार्गाने जाणे हा तात्पुरता पर्याय झाला, परंतु जागा न बदलता तोच महामार्ग नविन बनवला तर तो शाश्वत ऊपाय ठरतो,  अगदी तसच शेतीमधे कितीही समस्या तयार झाल्या तरीही शेती करने सोडून देने हा काही  त्यावर ऊपाय नाही , आपली शेती करण्याची पद्धत  नक्कीच आपण बदलु शकतो.  म्हणुनच आपण पुढील भागांमधे " समृद्ध माती तरच शेती " या अभियानाला सुरवात करणार आहोत. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्