blog

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ६

निसर्ग व वनस्पती हा सबंध खुप दृढ असला तरी सुद्धा निसर्गाच्या लहरी पणाचा फटका वनस्पती ला खुप सोसावा लागतो, निसर्गाच्या या स्वभावा मुळे वनस्पती स्वतःचे अस्तित्व टिकवुन ठेवण्याची सतत धडपड करत रहातात, वनस्पतींचा निसर्गावर मात करण्याचाच कल जास्त असतो व आपली स्वतःची नविन पिढी तयार करत असतात. (हेच मानव व इतर सृष्टीचे अन्न असते) आपण या पुर्वी च्या भागांमधे पाहिले आहे की द्राक्ष वेल भरपूर विश्रांती नंतरच परत नविन बहारासाठी सिद्ध होते, या विश्रांती काळातच बागेचे पोषन होणे गरजेचे असते, आता आपल्याला किती उत्पादन घ्यायचे आहे ते निच्छित करावे लागेल, पहिल्या बहारात किती उत्पादन मिळाले तेही महत्वाचे असते,  बर्याचदा पहिल्या बहारात जर जास्त उत्पादन मिळाले असल्यास पुढिल बहारात कमी उत्पादन मिळते व पहिल्यांदा कमी उत्पादन मिळाले असल्यास पुढिल बहारात जास्त उत्पादन मिळते  असाही अनुभव पहायला मिळाला आहे, परंतु खरड छाटणी नंतंर बागेची विषेश काळजी घेतल्यास नियमित एकसारखे उत्पादन घेता येने शक्य आहे, (बागेस अन्न पाणी, योग्य प्रकारे छाटणी ईं व्यवस्थापन ही महत्वाचे आहे). विश्रांती काळात प्रत्येक वेलीवर जातपरत्वे योग्य काडी संख्या व पाने शेवटपर्यंत निरोगी व धष्टपुष्ट असणे गरजेचे आहे, अर्धवट पोषनातुनच अनेक समस्या निर्माण होतात, द्राक्ष वेल रोग किडीस लवकर बळी पडणे, मालकाड्या अपक्व रहाणे, घड जिरने इत्यादी समस्यांना मग सामोरे जावे लागते, प्रत्येक वर्षी फळछाटणी पुर्वी द्राक्ष बागेतील मातीची प्रयोग शाळेत माती परिक्षण करणे गरजेचे आहे, आपल्या मातीत नेमके किती अन्नद्रव्ये आहेत मग इच्छीत उत्पादना साठी किती घटक द्यायचे ते ठरविने सोपे जाते. अनेक वेळा असेही पहायला मिळते की जमिनीत भरपूर प्रमाणात अन्न घटक आहेत परंतु ते पिकास ऊचलताच येत नाहीत किंवा ते घटक अविघटनशिल असतात, 15-20 वर्षापूर्वी ही समस्या फारच क्वचित ठिकाणी असायची परंतु आत्ता अनेक ठिकाणी हिच फार मोठी समस्या तयार झाली आहे. याची कारणेही अनेक आहेत माझ्या मते मोठे कारण जमिनीत वाढलेले अतिरिक्त व अविद्राव्य क्षार, खर तर भरपूर व नियमित हंगामी पाऊस पडल्यास हे क्षार जमिनीतुन निचर्यावाटे धुवून जायला हवेत (लिचआऊट) परंतु जमिनीत सेंद्रिय कार्बनच्या कमतरते मुळे व उपयुक्त जिवांणू च्या कमी संख्येमुळे जमिनी कडक व चिकट बनत चालल्या आहेत व मातीत क्षारांचे प्रमाण  हे वाढतच चालले आहे. जमिनीची विद्युत वाहकता (ई.सी.) वाढत चालली आहे. आपण पाठीमागील भागात पाहिल आहे द्राक्ष वेलीची पाने  सुर्यप्रकाश,  कार्बनडायऑक्साईड व पाणी यांच्या मदतिने स्वतःचे अन्न तयार करते, व वनस्पती ही प्रक्रिया करत असताना जमिनीतील घटक (एनपीके, सुक्ष्म व अतिसुक्ष्म) वनस्पती ला मदत करत असतात, (जमिनीतुन पुरवठा होत असलेल्या अन्नघटकांची वनस्पती ना तिच्या वेगवेगळ्या अवस्थां मधे सतत गरज असते) ईथेच एक परिणाम कारक घटना घडत असते , वनस्पती जो स्वतःसाठी अन्नसाठा तयार करत असते या प्रक्रियेत पानात, शेंड्यात व खोडात ऊर्जा तयार होत असते या ऊर्जेवर धनभाराचा प्रभाव जास्त असतो  (पॉझिटीव्ह चार्ज) हीच ऊर्जा पुढे मुख्य उत्पादनात बदलते. एका ठराविक अवस्थेनंतर ही ऊर्जा (विश्रांती काळ संपणे व ताण देण्याच्या अगोदर) वेलीच्या आंतरगत भागात साठवनुक करणे गरजेचे असते पण याच काळात जमिनीत निगेटिव्ह चार्ज सक्रिय असतो, व झाडातील बरिचशी धनभारित ऊर्जा जमिनीत निघुन जाते. (द्राक्षा पेक्षा इतर फळ पिकात ही समस्या जास्त आढळून येते आहे) सहज विद्युत वाहक धातुजन्य घटक मुळांच्या जवळ गरजेपेक्षा जास्त प्रमाणात साठल्यामुळे च द्राक्ष वेलीत कमी प्रमाणात अन्न साठा शिल्लक रहातो,  आणि मग तिथुनच द्राक्ष बागांची कसरत चालू होते. फुट एकसारखी न होने, वांझ फुटींची संख्या वाढने,  घड जिरने किंवा रोग किडी बळावने या सारख्या कुठल्या ना कुठल्या प्रकारात द्राक्ष वेल  बळी पडत रहाते. यावर एकच ऊपाय आहे आणि तो म्हणजे माती समृद्ध करणे. "समृद्ध माती तरच शेती" भविष्यात द्राक्ष बागांसमोर हेच एक आव्हान असनार आहे.  

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्