blog

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ४

वनस्पतींच्या विकासात व गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने  वाढीस निगेटिव्ह चार्ज बर्याच अंशी कारणीभूत असतो हे आता समजले असेलच, तसेच वनस्पती व निसर्ग यांच नात नक्की कसे असते हे एक गुढच असावे असे मला वाटते. निसर्गाच्या इश्याऱ्यावरच वनस्पती आपला जिवनक्रम सपन्न करत असतात व वनस्पतीं च्या सानिध्यामुळेच निसर्ग  त्याला हव तस घडवुन आणत असतो.  याच निसर्गाने वनस्पतीं साठी ठरलुन दिलेले  काही  नियम असतात, याच नियमानुसार (तत्वावर) व्यवसाईक शेतीची तत्वे आधारलेली आहेत. नैसर्गिक शेती व व्यवसाईक शेती किंवा आधुनिक शेती असे आपल्याकडे अनेकदा ऊलटसुलट चर्चिले जाते, खर तर गेली कित्येक शतके मानव जी वनस्पतींच्या मदतिने शेती करत आलाय याला नैसर्गिक शेती असे म्हणता येनार नाही खर तर शेतकरी वनस्पती ला नैसर्गिक पद्धतीने वाढूच देत नाही, निसर्ग नियमांचा फायदा घेत वनस्पती कडून हव तसे उत्पादन काढून घेतले जाते,  म्हणूनच आजची सर्वच शेती ही "अनैसर्गीक शेती पद्धती " आहे  असे म्हणावे लागेल. निसर्गाने वनस्पती (द्राक्ष वेल) साठी ठरवुन दिलेल्या अश्याच एका नियमाचा आपण आज अभ्यास पाहणार आहोत. वनस्पती निसर्गाच्या संकेतानंतरच उत्पादीत होतात. तो नियम असा आहे "जेव्हा जेव्हा वनस्पतींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो तेंव्हा तेंव्हा वनस्पती पुनरउत्पादनाकडे वळते " हाच तो निसर्ग नियम. आधुनिक शेती पद्धती मध्ये अनेक फळपिकांमधे याच तत्वाचा (नियमांचा) वापर करून बहार घेतले जातात, पेरू, डाळिंब, सिताफळ सारख्या पिकांमधे ठराविक विश्रांती नंतर मुळे ऊघडी पाडून थोडीफार मुळे तोडली जातात व त्या झाडांना एक प्रकारचा ताण ( त्रास) दिला जातो व बहार देण्यासाठी प्रवृत्त केले जाते. द्राक्ष वेलीस गर्डलिंग करून असाच ट्रेस दिला जातो परिणामी हमखास बहार काढला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोनातुन पाहिल्यास ज्यावेळी वनस्पती वरिल निगेटिव्ह चार्ज (प्रभाव) अतिशय कमी होतो त्या नंतरचा काळ वनस्पती कडून उत्पादन घेण्यासाठी योग्य असतो, द्राक्ष वेलीवरील (बहार   धरण्यासाठी)  निगेटिव्ह चार्ज कमी करण्याचा  काळ म्हणावे ऑक्टोबर छाटणी पुर्वी दिला जाणारा ताण हा होय. द्राक्ष बागेस योग्य पद्धतीने ताण दिल्यास (द्राक्ष वेलीवर चांगल्या मजबुत व पक्व काड्या तयार झाल्या असल्यास , जमिनीच्या प्रकारा नुसार 15 ते 20 दिवसांचा ताण पुरेसा होतो) हमखास व भरपूर  बहार निघतो, वनस्पती ची पाने (द्राक्ष वेल) भरपूर सुर्यप्रकाश व कार्बनडायऑक्साईड  वायुच्या मदतिने (फोटोसिंथेसीस) सतत अन्न निर्मिती करत असतात याच अन्न निर्मिती प्रक्रियेतून धन भाराची (पॉझिटीव्ह चार्ज) निर्मिती होत असते परंतु त्या धन भारात बल (फोर्स) निर्माण होत नाही कारण मुळातच द्राक्ष वेलीवर निगेटिव्ह चार्ज प्रभाव अधिक असल्या मुळे तो लगेचच उदासीन (मे युट्रल ) अवस्थेत जातो पण ही उदासीन अवस्था वेलीच्या मुळांजवळ येऊन थांबते. मात्र जेव्हा द्राक्ष वेलीची मुळे हे वरून येणार्या भाराचे (चार्ज) उदासीनीकरणाचे काम थांबवतात तेव्हा मात्र वेलिच्या आंतरगत भागात वेगवान हालचाली सुरू होतात व हाच निगेटिव्ह चार्ज "निगेटिव्ह फोर्स" मध्ये बदलायला सुरवात होते. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्