blog

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग २०

द्राक्षाचा घड वाढत असताना काही मणी मोठे न होता लहान आकाराचे राहतात. यालाच शार्ट बेरीज म्हणतात. शार्ट बेरीज होण्याची संभाव्य कारणे  परागीभवन चांगले न होणे, फुलांचे भाग विकृती असल्यास असे होते.  कर्बोदके (CHO) कमी पडल्यास फुले मण्यामध्ये विकसित होण्यास अडचण येते. जीए लवकरच्या स्टेजमध्ये वापरले तर शॉर्ट बेरीजचे प्रमाण वाढते. फळधारणेच्या काळात थंडी किंवा धुके असणे. बोरॉन व झिंक ह्या पोषक द्रव्यांची कमतरता. वेलीला व्हायरसची लागण झाल्यावरही असे होते. ही विकृती टाळण्यासाठी प्रमाणात जी. ए. सारखी संजीवके वापरावीत. सुक्ष्मद्रव्ये योग्य प्रमाणात द्यावीत. घडांची संख्या पानांच्या प्रमाणात ठेवावी, म्हणजे कर्बोदके कमी पडणार नाहीत. घडांची विरळनी योग्य वेळी करावी. म्हणजे शाॅर्ट बेरिज होनार नाहित. द्राक्षे पिकायला लागल्यानंतर द्राक्ष घडातील  काही मणी रंगाला मंद दिसतात, नरम पोताचे असतात, त्यात गर नसतो, गोडी नसते, फक्त आंबट पाणी असते. हे मणी संपूर्ण घडात इकडे तिकडे पसरतात. माल झाडावर जास्त दिवस ठेवल्यास हे मणी सुकतात व कधी कधी गळूनही जातात. एकूण वजनात त्यामुळे घट होते. झाडावरून द्राक्षे तोडल्यावर हे मणी लवकर सुकतात. त्यामुळे बाजारात पेटीतील माल खराब दिसतो. ह्या मण्यांना 'वॉटर बेरीज' म्हणतात. हे बनण्याची संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे पालाशची कामतरता, मणी पोसत असताना पाण्याचा ताण, जास्त नत्र, द्राक्ष घडांना कॅल्शियम पुरवठा कमी पडणे. द्राक्ष वेलीवर प्रमाणापेक्ष जास्त द्राक्ष घड ठेवल्यास अन्नद्रव्ये कमी पडतात,  द्राक्ष घड घट्ट झाल्यास मण्यांच्या पेशी (झायलम) दबून जातात व पुढे अन्नपुरवठा होत नाही, त्यामुळेही वॉटरबेरीज वाढतात , वर नमुद केलेल्या कारणांचा निट विचार केल्यास आपल्याला वॉटरबेरीज निश्चित कमी करता येतील. मात्र सर्व उपाय फलधारणा होत असतानाच कराव्यात. फळछाटणी पुर्वीच माती व काडीची अन्नद्रव्य परिक्षण केल्यास त्यानुसारच अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करता येईल.

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्