blog

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १९

नमस्कार शेतकरी बंधूनो,  आपण कालच्या भागात अती थंड तपमाना मुळे द्राक्ष मणी तडकण्याची कारणे व उपाययोजना या विषयी जाणून घेतले आहे, क्रॅकिंग बरोबरच इतरही अनेक प्रकारची विकृती द्राक्ष घडा मधे येत असते या विषयी आपण जाणून घेणार आहोत. द्राक्ष मण्यांमधे प्रामुख्याने शाॅर्ट बेरिज, वाॅटर बेरिज, पिंक बेरीज, मणी देठ जळ (स्टाॅक निक्रोसिस) व मणी हिरवे रहाणे इत्यादी विकृती आढळतात. द्राक्षमण्याच्या देठाची जळ या विकृतीमध्ये द्राक्षमण्यात साखर भरण्याचे वेळेपासून देठावर टाचणीचे टोकाएवढे प्रथम पांढरट तपकिरी ठिपके पडून नंतर ते काळपट तपकिरी होतात आणि पक्ववेत वाढ होत असताना या ठिपक्यांच्या आकारातही वाढ होऊन असे अनेक ठिपके एकत्र आल्याने घडांचे अथवा मण्यांचे देठ जळून जातात. पक्वता जशी वाढत जाईल तसतशी ही विकृती वाढत जाते. यामुळे वेलीमधून साखर, पाणी आणि इतर घटकांचे वाहन यावर परिणाम होतो आणि याचा परिणाम मऊ, हिरवट , बिलबिलीत , पाणीदार आणि परिणामी सुकलेले द्राक्षमणी घडामध्ये तयार होतात. शेवटी याचा परिणाम घडांचे ताजे वजन, रसाचे उत्पादन, विद्राव्य साखर आणि अॅन्थोसायनीनसारखे रंगीत घटक यावर अनिष्ट परिणाम होतो, तर द्राक्षमण्यांचे आम्लतेत वाढ होते. द्राक्षाचे उत्पादनावर आणि प्रतीवर आश प्रकारे अनिष्ट परिणाम झाल्यामुळे दर्जेदार उत्पादन घटते. परिणामी निर्यातक्षम द्राक्षे तयार करण्यात अडचणी येतात. ही विकृती संजीवके आणि अन्नद्रव्ये यांचा असमतोल विशेषत : पोटॅश कॅल्शियम + मॅग्नेशियम यांचे गुणोत्तर यांचेशी संबंध असतो

अमोनिकल नत्राचा आणि पोटॅशचा पुरवठा करणे टाळावे. हे दोन्ही घटक कॅल्शियमच्या शोषणावर वाईट परिणाम करतात. मणी 8 एम. एम. आकाराचे असतानांच कॅल्शियम क्लोराईड 500 ग्रॅम / 200 लिटर पाण्यातून फवारावे. त्यानंतर यानंतर 10 दिवसाच्या अंतराने २ फवारे द्यावेत. 10 एम. एम. बेरी साईज असतांना नंतर 2 वेळा 10 दिवसांच्या अंतराने मॅग्नेशियम सल्फेटचे फवारे द्यावेत. प्रमाण 5  ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रती लि.पाण्यातून द्यावे. मॅग्नेशियम  सल्फेट सोबत एसव्हि किटोन एकत्र मिसळून फवारणी केल्यास चांगला फायदा होतो,  याच काळात पानांवर चांगला धन भार सक्रिय ठेवण्यासाठी एसव्हि किटोन अत्यंत प्रभावी पणे काम करते. पानांवर जेव्हा धन भार सक्रिय असतो तेव्हा मुळांवर निगेटिव्ह चार्ज सक्रिय झालेला असतो. व मुळांचे काम पुर्ववत चालु होते. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्