एसव्हि फ्रूटर

अन्नद्रव्ययुक्त भूसुधारक !

हे उच्च  प्रतिच्या सेंद्रिय घटकापासून तयार करण्यात आले आहे. यामध्ये बोनमील, समुद्री शेवाळ, सीवीड एक्सट्रेक्ट,अमिनो असिड्स,कडुनिंब लाकडीची राख (अर्क ), मोलॅसिस, बॅन्टोनाईट, डोलमाइट, वर्मीवॉश इत्यादी सेंद्रिय घटकापासून तयार करण्यात आले आहे. एसव्हि फ्रूटर जमिनीला व पिकांना सेंद्रिय स्वरूपात फॉस्फरस, नायट्रोजन, बायोपोटॅश, कॅल्शिअम इत्यादी  पोषक तत्वे उपलब्ध करून देते. हे एक उत्तम प्रतीचे भूसुधारक असून या खताने सर्व प्रकारच्या पिकांचे उत्पादन वाढते  व उत्पादीत मालाचा दर्जाहि चांगला राखला जातो. रसायनमुक्त शेतमाल फळे इत्यादींसाठी व सेंद्रिय शेतीसाठी अतिशय उत्तम प्रकारचे खत म्हणून उपयोग होतो.

 

एसव्हि कँन्टर

सेंद्रिय दाणेदार भूसुधारक !

हे उच्च  प्रतिच्या सेंद्रिय घटकापासून तयार करण्यात आले आहे. यामध्ये बोनमील, समुद्री शेवाळ, सीवीड एक्सट्रेक्ट, अमिनो असिड्स, कडुनिंब लाकडीची राख (अर्क ), मोलॅसिस, बॅन्टोनाईट,डोलमाइट, वर्मीवॉश इत्यादी सेंद्रिय घटकापासून तयार करण्यात आले आहे. जमिनीला व पिकांना सेंद्रिय स्वरूपात फॉस्फरस, नायट्रोजन, बायोपोटॅश, कॅल्शिअम  इत्यादी  पोषक तत्वे नैसर्गिक स्वरूपात  पिकांना उपलब्ध होतात. हे एक उत्तम प्रतीचे भूसुधारक असून या खताने सर्व प्रकारच्या पिकांचे उत्पादन वाढते  व उत्पादीत मालाचा दर्जा हि चांगला राखला जातो. रसायनमुक्त शेतमाल फळे इत्यादींसाठी व सेंद्रिय शेतीसाठी अतिशय उत्तम प्रकारचे खत म्हणून उपयोग होतो.

               हे उच्च  प्रतिच्या सेंद्रिय  घटकापासून तयार करण्यात आले आहे. यामध्ये बोनमील, समुद्री शेवाळ, सीवीड एक्सट्रेक्ट, अमिनो असिड्स, कडुनिंब लाकडीची राख (अर्क), मोलॅसिस, बॅन्टोनाईट, डोलमाइट, वर्मीवॉश इत्यादी सेंद्रिय घटकापासून तयार करण्यात आले आहे. जमिनीला व पिकांना सेंद्रिय स्वरूपात फॉस्फरस, नायट्रोजन, बायोपोटॅश, कॅल्शिअम  इत्यादी  पोषक तत्वे नैसर्गिक स्वरूपात  पिकांना उपलब्ध होतात. हे एक उत्तम प्रतीचे भूसुधारक असून या खताने सर्व प्रकारच्या पिकांचे उत्पादन वाढते व उत्पादीत मालाचा दर्जा हि चांगला राखला जातो. रसायनमुक्त शेतमाल फळे इत्यादींसाठी व सेंद्रिय शेतीसाठी अतिशय उत्तम प्रकारचे खत म्हणून उपयोग होतो.

एसव्हि ५९

द्रवस्वरूपातील भूसुधारक !

हे निसर्गात असणाऱ्या काही खास वनस्पती अर्क, नैसर्गिक संप्रेरक, व्हूमिक असिड व अनेक प्रकारच्या सेंद्रिय अर्कापासून निर्मिती केले आहे (बॉटनिकल एक्सट्रॅक्ट).
                  जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये भरपूर अन्नद्रव्ये असतात. परंतु काही कारणांमुळे ती पूर्ण क्षमतेत शोषून घेता येत नाही. शिवाय वेगवेगळी रासायनिक खते तननाशके व विषारी किटकनाशकांच्या अति जास्त वापरामुळे जमिनीत असणारी जीवनसृष्टी  हि कमी होत आहे. एसव्ही ५९  च्या वापरामुळे जमिनीत जिवाणूंच्या संख्येत वाढ होते व जमिनीचे आरोग्य सुधारून जमीन उपजावू बनते व पर्यायाने पीक जोमदार वाढते व पिकांची रोग प्रतिकार क्षमता प्रचंड वाढते. एसव्हि ५९ हे पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे वापरण्यास निर्धोक आहे.  भुसुधारणा करण्यासाठी किंवा जमिनीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी बांधवांसाठी एस व्हि ५९ हा एक उत्तम पर्याय आहे.   

वैशिष्ट्ये

 • जमिनीचा पोत सुधारतो.
 • माती पोकळ झाल्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता व हवा खेळती राहण्याची क्षमता वाढते.
 • जमिनीत उपयुक्त जिवाणूंची क्षमता वेगाने  वाढते. 
 • जमिनीमध्ये जिवाणू वाढीसाठी पोषक वातावरणात तयार होते
 • काही कालांतराने गांडुळाची संख्या वाढते.
 • पांढऱ्या पुळांची संख्या व लांबी वाढते.
 • पिकांची वाढ जोमदार व निरोगी होते.
 • पिकांच्या मुख्य उत्पादनात भरपूर वाढ होते.
 • फळांचा दर्जा अतिशय उत्तम राखला जातो.
 • रासायनिक खतांचा वापर ५०% ते ७०% कमी होऊ शकतो.
 • पिकांची रोगप्रतिकार क्षमता व ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
 • एकूणच पिक उत्पादन खर्चात मोठी बचत होते.
एसव्हि किटोन

हे काही खास प्रकारचे वनस्पती अर्क, नैसर्गिक व सहज उपलब्ध होणारी संप्रेरके व उच्चप्रतीची प्राणीजन्य प्रथिनापासून फरमेंटेंशन पद्धतीने तयार केले जाते (बॉटनिकल एक्सट्रॅक्ट). एसव्हि किटोन हे पूर्णपणे सेंद्रिय उत्पादन आहे व सर्व प्रकारच्या पिकांना उपयुक्त आहे. एसव्हि किटोन वनस्पतीच्या संप्रेरके वहन (चयापचय ) क्रियेमध्ये पिकांना मदत करते व शोषून घेण्यासाठी पिकांची परिणामकारक रित्या मदत करते. पिकांचे योग्यवेळी फुलोरा अवस्था येण्यास मदत करते. पिकांच्या पानांमध्ये एक प्रकारची खास चमक निर्माण करते व फळांचे प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण करते. यातील नैर्सगिक सायटोकायनिन घटक फळांची आकार वाढण्यास मदत करते. फळे व भाज्या मध्ये अधिक जीवनसत्वे व अन्नद्रवे निर्माण करण्यास मदत करते. एसव्हि किटोनचा द्राक्षे, डाळिंब, भात, कपास, सोयाबीन, केळी, पपई, आंबे, पेरु, बोर, ऊस, कांदा, बटाटा, मिरची, वांगी, सर्व प्रकारच्या तृणधान्य व सर्व प्रकारची फुलपिके इत्यादींसाठी उपयोग होतो.  

एसव्हि फुलोरा

हे उच्च प्रतिच्या आयुर्वेदिक वनस्पतींच्या अर्कापासून निर्मित आहे. यात नैसर्गिक अमिनो ऍसिडस् व फुल्विक ऍसिड यांचे अनोखे मिश्रण आहे. कोणत्याही प्रकारच्या बियाण्यांची सुप्तावस्था थांबवून ताबडतोब उगवन क्षमता निर्माण करते. तसेच पिकांना झटकन फुलोरा अवस्थेत आणण्यास मदत करते. एसव्हि फुलोरा ताबडतोब वनस्पतींमध्ये शोषले जाते. फळपिकांना एक वेळी व एकसमान कळ्या येण्यास मदत करते. फुलकळी गळ थांबविते. कळीमधील विकृती थांबवून फुले तेजदार व निरोगी ठेवण्यास मदत करते.  एसव्हि फुलोरा सर्व प्रकारच्या पिकांवर फायदेशीर आहे. बीज प्रक्रियेत लहान प्रकारची बियाणे, यामध्ये मिरची, टोमॅटो ,वांगी ,कोबी ,भात ,कपास इ. साठी १ लि. पाण्यामध्ये २० ते ३० मिली मिसळून या द्रावणात बियाणे भिजवून घ्यावेत व बियाणे सावलीत सुकवून नंतर पेरणी करावी.

एसव्हि राऊंडर पी

रोग प्रतिबंध !
एसव्हि राऊंडर पी  हे निसर्गात आढळणाऱ्या (दुर्मिळ) जिवाणू रोधक वनस्पती अर्कापासून (एक्सट्रॅक्ट) बनविण्यास आले आहे. यामध्ये वापरले गेलेले नैसर्गिक जिवाणू रोधक तत्व वेगवान पद्धतीने कार्यरत होतात व जिवाणू, विषाणू तसेच बुरशी यांची वाढ थांबविते. तसेच जमिनीतील पिकांच्या मुळांवरील सूत्रकृमींचा गाठी नियंत्रणासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. 
 
वैशिष्ट्ये :

 • विविध प्रकारचे जिवाणूजन्य रोगांवर त्वरित नियंत्रण करते.
 • बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करते. 
 • रोग आल्यानंतर व रोग येऊ नये म्हणून पिकांमध्ये जबदस्त प्रतिकार क्षमता तयार करते. 
 • सूत्र कृमींच्या गाठी काढण्यास मदत करते. 
एसव्हि राऊंडर एल

रोग प्रतिबंध !

निसर्गात आढळणाऱ्या (दुर्मिळ) जिवाणू रोधक वनस्पती अर्कापासून (एक्सट्रॅक्ट) बनविण्यास आले आहे. एसव्हि राऊंडर एलचा उपयोग फळबागांच्या छाटनिनंतर लगेचच केल्यास झाडांना होणाऱ्या छाटणीच्या जखमा व फळांना होणाऱ्या सर्व प्रकारचे जखमा ताबडतोब निर्जतुक करण्यासाठी फायदेशीर आहे. एसव्हि राऊंडर एलच्या फवारणीमुळे नवीन येणारी कळी व काडी वरील डोळे यांच्यावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. वारंवार होणाऱ्या हवामानातील बदलानंतर पिकांवर होणाऱ्या अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी विविध रोगांवर प्रतिबंधात्मक म्हणून एसव्हि राऊंडर एल उत्तम काम करते. एसव्हि राऊंडर एल सोबत सर्व प्रकारची रसायने, संजीवके व सेंद्रिय उत्पादके एकत्र मिसळता येतात. हे लिक्विड स्वरूपात असल्यामुळे वापरण्यास सोईचे जाते. 

एसव्हि एक्झिटम

एसव्हि एक्झिटम हे एक सेंद्रिय प्रकारचे बुरशीनाशक आहे.

यामध्ये अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य औषधी अर्क वापण्यात आलेले आहे. हे पूर्णपणे बिनविषारी व सेंद्रिय उत्पादक आहे. ऑरगॅनिक फळे व भाज्या निर्मितीसाठी यांचा वापर चांगल्या प्रकारे होऊ शकतो. एसव्हि एक्झिटम चा उपयोग डाऊनी मिलड्यू, भुरीरोग, फळकूज, मुळांची कूज, फळावरील व पानावरील काळे डाग तसेच मातीत तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या बुरशी रोगांना नायनाट करण्यासाठी होतो. एसव्हि एक्झिटम चा वापर सर्व प्रकारचे फळे, पालेभाज्या, नगदी पिकांवरील बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवून देण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करता येतो. 

एसव्हि डिफेन्स

एसव्हि डिफेन्स हे एक सेंद्रिय जिवाणू व बुरशीनाशक आहे.

याचा वापर प्रामुख्याने डाळिंब पिकातील तेल्या (बॅक्टेरीयल ब्लाइट) व द्राक्ष पिकातील भुरी रोगाचे नियंत्रण करण्यासाठी केला जातो. एसव्हि डिफेन्स हे निसर्गातील काही औषधी व दुर्लभ वनस्पतींच्या अर्कापासून तयार करण्यात आले आहे. एसव्हि डिफेन्स हे कोणत्याही परिस्थितीत तेल्या रोगाचे जिवाणू तात्काळ नष्ट करण्याचे काम करते .कोणत्याही प्रकारच्या घातक बुरशींना लगेच नष्ट करते.  डाळिंब व द्राक्ष्यासोबतच सर्व प्रकारच्या पालेभाज्या, धान्यपिके व नगदी पिके यांवरील जिवाणू व बुरशींवर सेंद्रिय पद्धतीने त्वरित नियंत्रण मिळवून देण्यासाठी एस व्हि डिफेन्स हा एक उत्तम पर्याय आहे. 

एसव्हि फायटर ७+

एसव्हि फायटर ७+ हे सेंद्रिय पद्धतीने व अत्याधुनिक तंत्रज्ञावर आधारित किटकनाशक आहे.

यामध्ये अनेक प्रकारच्या किटकनाशक गुणधर्म असणाऱ्या औषधी वनस्पतींचे अर्क जसे कि लसूण, रतनज्योत, कोरफड, गोमूत्र अर्क इत्यादी घटकांपासून तयार करण्यात आलेले आहे. हे पूर्णपणे सेंद्रिय उत्पादन असून तात्काळ परिणाम दाखविते. निर्यात क्षम शेतमाल व फळे (रेसिड्यु फ्री) तयार करण्यासाठी फायटर ७+ उपयोग थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी व इतर प्रकारच्या किडींच्या कोषांचा नायनाट करण्यासाठी होतो. विशेषतः डाळिंब, द्राक्ष, भात, कपास व पालेभाज्या पिकांवरील थ्रिप्स, मावा किडीवर प्रभावी नियंत्रण करते. 

एसव्हि फायटर ११

एसव्हि फायटर ११ पूर्णपणे सेंद्रिय व नॅनोतंत्रज्ञानावर आधारित प्रभावी किटकनाशक आहे.

थ्रिप्स, मावा, पांढरी माशी व इतर रसशोषक किडी आणि लेपिडोप्टरा फॅमिली (स्पोडोप्टेरा, हेलिकोव्हर्पा, प्लुटेला इ.) प्रकारच्या उपद्रवी किटकांवर प्रभावी नियंत्रण मिळवून देते. पिकांवर एसव्हि फायटर ११ ची फवारणी झाल्यानंतर सर्व हानिकारक किटक अर्धांगवायू ग्रस्थ होतात व त्वरित खाणे बंद करतात. 
              एसव्हि फायटर ११ हे उत्पादन किडीच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या नुकसानग्रस्थ भागास उत्तेजन देणारी उत्कृष्ट वाढ प्रणाली आहे. फॉर्म्युलेशन मधील सर्व घटक नैसर्गिक आणि पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहेत व पिकावर कोणतेही अवशिष्ठ प्रभाव सोडणारे नाहीत. 

एसव्हि साईज बिल्डर

एसव्हि साईज बिल्डर हे ऑक्झनचे अनोखे मिश्रण असून कमी वेळेत नैसर्गिकपणे फळाचा आकार वाढवण्यासाठी फार प्रभावी आहे.  

सर्व व्हिटॅमिन, टास्कोहेरॉल, पायरीडेक्सी - ५ फॉस्फेट, फुल्विक ऍसिड, प्रथिने आणि एन्झाइम्स हे वनस्पतीला आवश्यक पोषक आणि जीवनसत्वे यांचा पुरवता करते, या मुळे फळांची आणखी झपाट्याने वाढ होते, सर्व पिकांमध्ये फळांच्या आकारमानाच्या विकासातील महत्वाची भूमिका पार पडते. 
        हे फळांमध्ये रंग आणणे आणि चकाकी वाढविण्याचे काम करते. फळ बागेत फळांची संख्या जास्त असलेल्या परिस्थितीत फळांच्या आकारमानात व वजनात कमी वेळेत वाढ करण्याचे काम करते.  

एसव्हि टर्मिनस

पाण्याचा डॉक्टर ! 
किडनाशक फरवारणीसाठी वापरलेल्या पाण्याचा पीएच (सामू ) योग्य ठेवल्यास पिकाकडून या द्रावणाचे शोषण चांगले होते. किडनाशकाची क्रियाशीलताही अधिक काळ राहिल्याने अपेक्षित परिणामही चांगले मिळतात.  मात्र बहुतांश शेतकरी फवारणीच्या पाण्याच्या दर्जाकडे लक्ष देत नाही. पाण्याच्या स्त्रोतामध्ये औद्योगिक रसायने, शहतातील प्रदुषित पाणी आदी घटक मिसळले गेल्याने ते फवारणीयोग्य राहत नाहीत . त्याचा सामू (पी एच) ७ पेक्षा अधिक (८ ते १० पर्यंत) असतो. अशा पाण्यामध्ये मिसळलेल्या घटकाचे  विघटन लवकर होते. या प्रक्रियेला अल्कलाईन हायड्रोलीसीस म्हणतात. सामू ८ ते ९ च्या दरम्यान असलेल्या द्रावणामध्ये हि क्रिया जलद घडते. अशा द्रावणात शोषण पिकांकडून कमी प्रमाणात होते. अपेक्षित परिणामही मिळत नाहीत, त्यामुळे फवारणीसाठी वापरलेल्या पाण्याचा पीएच योग्य, म्हणजे ६ ते ६.५ च्या दरम्यान असावा म्हणजे या द्रावणाचे पिकाकडून चांगले शोषण होते. एस व्हि टर्मिनस याठिकाणी खुबीने काम करून फवारणीच्या पाण्याचा पी एच नियंत्रित करून ६ ते ६.५ करते. एस व्हि टर्मिनस जमिनीतूनही देता येते.