पाण्याचा डॉक्टर !
किडनाशक फरवारणीसाठी वापरलेल्या पाण्याचा पीएच (सामू ) योग्य ठेवल्यास पिकाकडून या द्रावणाचे शोषण चांगले होते. किडनाशकाची क्रियाशीलताही अधिक काळ राहिल्याने अपेक्षित परिणामही चांगले मिळतात. मात्र बहुतांश शेतकरी फवारणीच्या पाण्याच्या दर्जाकडे लक्ष देत नाही. पाण्याच्या स्त्रोतामध्ये औद्योगिक रसायने, शहतातील प्रदुषित पाणी आदी घटक मिसळले गेल्याने ते फवारणीयोग्य राहत नाहीत . त्याचा सामू (पी एच) ७ पेक्षा अधिक (८ ते १० पर्यंत) असतो. अशा पाण्यामध्ये मिसळलेल्या घटकाचे विघटन लवकर होते. या प्रक्रियेला अल्कलाईन हायड्रोलीसीस म्हणतात. सामू ८ ते ९ च्या दरम्यान असलेल्या द्रावणामध्ये हि क्रिया जलद घडते. अशा द्रावणात शोषण पिकांकडून कमी प्रमाणात होते. अपेक्षित परिणामही मिळत नाहीत, त्यामुळे फवारणीसाठी वापरलेल्या पाण्याचा पीएच योग्य, म्हणजे ६ ते ६.५ च्या दरम्यान असावा म्हणजे या द्रावणाचे पिकाकडून चांगले शोषण होते. एस व्हि टर्मिनस याठिकाणी खुबीने काम करून फवारणीच्या पाण्याचा पी एच नियंत्रित करून ६ ते ६.५ करते. एस व्हि टर्मिनस जमिनीतूनही देता येते.
फवारणी द्रावणासाठी- ०.५ ते १ मिली प्रति लिटर पाण्यासाठी