हे निसर्गात असणाऱ्या काही खास वनस्पती अर्क, नैसर्गिक संप्रेरक, व्हूमिक असिड व अनेक प्रकारच्या सेंद्रिय अर्कापासून निर्मिती केले आहे (बॉटनिकल एक्सट्रॅक्ट).
जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये भरपूर अन्नद्रव्ये असतात. परंतु काही कारणांमुळे ती पूर्ण क्षमतेत शोषून घेता येत नाही. शिवाय वेगवेगळी रासायनिक खते तननाशके व विषारी किटकनाशकांच्या अति जास्त वापरामुळे जमिनीत असणारी जीवनसृष्टी हि कमी होत आहे. एसव्ही ५९ च्या वापरामुळे जमिनीत जिवाणूंच्या संख्येत वाढ होते व जमिनीचे आरोग्य सुधारून जमीन उपजावू बनते व पर्यायाने पीक जोमदार वाढते व पिकांची रोग प्रतिकार क्षमता प्रचंड वाढते. एसव्हि ५९ हे पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे वापरण्यास निर्धोक आहे. भुसुधारणा करण्यासाठी किंवा जमिनीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी बांधवांसाठी एस व्हि ५९ हा एक उत्तम पर्याय आहे.
वैशिष्ट्ये
जमिनीचा पोत सुधारतो.
माती पोकळ झाल्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता व हवा खेळती राहण्याची क्षमता वाढते.
जमिनीत उपयुक्त जिवाणूंची क्षमता वेगाने वाढते.
जमिनीमध्ये जिवाणू वाढीसाठी पोषक वातावरणात तयार होते
काही कालांतराने गांडुळाची संख्या वाढते.
पांढऱ्या पुळांची संख्या व लांबी वाढते.
पिकांची वाढ जोमदार व निरोगी होते.
पिकांच्या मुख्य उत्पादनात भरपूर वाढ होते.
फळांचा दर्जा अतिशय उत्तम राखला जातो.
रासायनिक खतांचा वापर ५०% ते ७०% कमी होऊ शकतो.
पिकांची रोगप्रतिकार क्षमता व ताण सहन करण्याची क्षमता वाढते.