द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ८

द्राक्ष शेती मध्ये  भविष्यात  माती चे आरोग्य शाश्वत व समृद्ध ठेवणे  हेच फार मोठे आव्हान असणार आहे. मागील भागात आपण  थोडक्यात पाहिले मातीचा पीएच व क्षारता वाढण्याची कारणे व द्राक्ष वेलीवर होणारा दुष्परिणाम काय होतो , यावर सद्ध्या तर एकच ऊपाय आहे तो म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब (ऑरगॅनिक कार्बन) वाढविने हाच आहे . माती परिक्षण अहवालामधे  सेंद्रिय कार्बन हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मानला जातो, मातीचा नमुना परिक्षण झाल्यानंतर सेंद्रिय कर्बाची वर्गवारी पुढील प्रमाणे केली जाते,  0 ते 0.30 - कमी, 0.30 ते 0.50 - मध्यम व 0.50 ते 1.0 चांगला, (अनेक कृषी तज्ञ व नामवंत अभ्यासक मंडळी सांगतात की  0.80 च्या आसपास सेंद्रिय कर्ब असेल तर ठिक आहे चांगला आहे)
काही  दिवसांपूर्वी एका गुजराती शेतकरी मित्राने त्याच्या शेतातल्या  मातीचा नमुना थेट अमेरिकेतील प्रख्यात मृदा प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवला. त्या अहवालामधे भारतीय शेतीसाठी सेंद्रिय कार्बन ची वर्गवारी अशी केली होती,  0.80 च्या खाली अत्यंत कमी- 0.80 ते 1.50 मध्यम व 1.50  ते 3.0 पासून पुडे ऊत्तम. आम्ही सेंद्रिय कार्बन ला का एवढे महत्व देत नाही याचच फार नवलही वाटत आहे वाईटही वाटत आहे, सेंद्रिय कार्बन चे महत्व आम्हाला चांगलेच माहीत आहे, परंतु  ही बाब  शेतकरीवर्गाने व शेतीतज्ञांकडून हवी तेवढी गांभिर्याने घेतली जात नाही, जमिनीची सुपिकताच मुळी सर्वस्वी सेंद्रिय कर्बावर अवलंबून आहे. जमिनीस भौतिक, रासायनिक व जैविक  गुणधर्म हे केवळ सेंद्रिय कर्बामुळे प्राप्त होतात. जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढल्याने सुपिकता आणि पिक उत्पादकता शाश्वत ठेवली जाते. जमिन ही भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांनी युक्त असे सजीव माध्यम आहे. अशी जमिन सर्वच वनस्पती ना आधाराबरोबरच योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी आणि आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करते, सेंद्रिय कार्बन चे  एवढ महत्व आम्हाला माहीत असुनही आमच्याकडे मात्र या बाबतीत फारच उदिसिनता पहायला मिळते, गेली तीन चार वर्षात द्राक्ष पिकविनार्या  विभागातील अनेक जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चक्क 0.30 च्या खाली  (जवळपास 50% जमिनी) आलेले आहेत, (हे फारच गंभिर आहे, वाळवंटाची व्याख्या करताना तज्ञ मंडळी सांगतात की ज्या जमिनीचा सेंद्रिय कार्बन 0.50 टक्के च्या खाली असल्यास  त्या जमिनीला वाळवंट म्हणतात ? ) आणि या विषयाशी अनभिज्ञ असनारे आमचे द्राक्ष बागाईतदार शेतकरी बंधू  प्रत्येक ऑक्टोबर छाटणी च्या पुर्वी  एका नव्या ऊमेदिने कामाला लागतात, चला आता या वर्षी तरी आपली द्राक्ष विक्रमी दर्जाची अन विक्रमी टनेजची निघतील. प्रत्येक शेतकरी बंधूने आता तरी कृषी साक्षर होणे गरजेचे आहे, मातीचा कस टिकवून ठेवण्यासाठी काय करावे लागेल ते केले पाहिजे, कारण माती समृद्ध असली तरच शेती टिकणार आहे व पिकणार आहे. माती च्या सेंद्रिय कार्बन वरच जमिनीचा जिवंतपणा अवलंबून आहे. सेंद्रिय कार्बन कमी होण्याचे एक मोठे कारण म्हणजे शेतीत सेंद्रिय निविष्ठांचा कमी वापर,  पिकांचे अवशेष नष्ट करने, अतिरिक्त नत्र युक्त खंताचा वारंवार वापर करणे विनाकारण जमिनीत अनेक प्रकारची घातक रसायने सोडने व विविध रसायनांमुळे प्रदुर्शित झालेले पाणी साठे हेच पाणी शेतीसाठी वापरले जाते, याच कारणांमुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस कमी होत आहे. हा सेंद्रिय कार्बन वाढवण्या साठी जमिनीमधे नियमित ऊत्तम कुजलेले शेनखत,  गांढूळ खत,हिरवळीची खते , जिवाणू खंतांचा वापर करावा लागेल.  पिकांच्या शिल्लक अवशेषांचा पुनर्वापर करावा लागेल तसेच जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांचा जमिनीवर आच्छादना साठी वापर करावा लागेल. जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय घटक असल्यास अशा जमिनीत विविध ऊपयोगी जिवाणू व गांढूळ संख्या वाढेल व जमिनी सतत  पोकळ व सछिद्र राहील, जमिनीत ऑक्सिजन व पाण्याचे समतोल प्रमाण ही रहाते, द्राक्ष वेलीची मुळे अश्या जमिनीत अफाट कार्यक्षम रहातात व अशीच सेंद्रिय कर्ब भरपूर असलेली जमिनच द्राक्ष वेलीच्या मुळावरील निगेटिव्ह चार्ज व पाॅजिटिव्ह चार्ज स्वतःच्या नियंत्रणात ठेवते, कोनत्या वेळी कोनता भार कमी वा जास्त ठेऊन वेलीस योग्य वेळी उत्पादना साठी सक्रिय करायचे हे फक्त सुपिक  जमिनीच्या च नियंत्रणात असते, म्हणून च या पुढे शाश्वत शेती टिकवण्या साठी " समृद्ध माती तरच शेती " ही संकल्पना राबवावी लागणार आहे. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्


Posted Date - 26-09-2019

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ७

द्राक्ष बागेची ऑक्टोबर छाटणी पुर्वी माती परिक्षण करणे हे फार महत्वाचे असते, जमिनीत  असनार्या विविध घटकांचे प्रमाण समजू शकते, माती परिक्षण अहवाला मधे पहिला घटक जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक म्हणजेच पीएच,  ऊत्तम द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी जमिनीचा पीएच सहा ते  साडेसात च्या दरम्यान  (6-7.5) असावा, परंतु अलिकडे अनेक द्राक्ष जमिनी या जास्त पीएच ने ग्रासलेल्या पहायला मिळतात,  काही ठिकाणी तर चुनखडीचे प्रमाण  जास्त असलेल्या जमिनीतही द्राक्ष बागांच्या लागवडी केल्या गेल्या आहेत, अश्या जमिनीत साहजिकच चुन्याचे प्रमाण जास्त असते तेथिल माती अतिविम्ल  (अल्कली) प्रकारात मोडते अशा जमिनीचा पीएच साडेसात ते नऊ पर्यंत असतो,  अशा जमिनीत द्राक्ष वेलीची वाढ समाधान कारक होत नाही व पुढे घड फुगवन सुद्धा अपेक्षित होत नाही, अती चुना किंवा कॅल्शियम चे अती प्रमाण असलेल्या द्राक्ष मुळांवर (सुरवाती पासूनच)  निगेटिव्ह चार्ज कमी प्रमाणात असतो, साहजिकच अश्या जमिनीत बरिचशी अन्नद्रव्ये द्राक्ष वेल ऊचलु शकत नाही, गंधक , मॅग्नेशियम,  पोटॅशियम, फेरस सारखे घटक जास्त प्रमाणात देऊनही या घटकांची ऊचल (अपटेकिंग) होत नाही.   ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण बिलकुल नाही किंवा अत्यल्प आहे अशाही जमिनीचा पीएच वाढलेला आढळत आहे, याचे कारण अति क्षारयुक पाणी व गरजेपेक्षा जास्त प्रमाणात रसायनांचा वापर हेच आहे, अशा जमिनीत माती मध्ये सोडीयम, क्लोराईड, फ्लुओराईड्स, लेड, अर्सेनिक, मर्क्युरी,ब्रोमाईड, कॅल्शियम व नायट्रेट  सारखे अनेक घटक प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले आढळून येत आहेत, या दोन्ही प्रकारच्या जमिनीत मात्र पीएच  वाढलाच जातो,  (इंदापूर तालुक्यात एका द्राक्ष बागेत जमिनीचा प्रकार ऊत्तम असुनही (चुनखडी नसलेली) माती परिक्षणात मातीचा पीएच 10 आढळून आला? ) मग अश्या जमिनीमधे अनेक समश्या तयार होतात, अशा जमिनीत क्षारांचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाल्यामुळे तेथिल द्राक्ष वेलींच्या मुळांवर  निगेटिव्ह चार्ज गरजे पेक्षा जास्त वाढतो व जमिन चिकट व कडक बनते,  पीएच सुद्धा साडेसात च्या पुढे जातो एकूणच जमिनीचे आरोग्य बिघडते, जमिनीत कडकपणा व चिकटपणा वाढल्या मुळे तेथिल जमिनीचा पाण्याचा निचरा कमी होतो केवळ या कारणामुळे मातीत वाढलेले अतिरिक्त क्षार जमिनीच्या बाहेर पडत नाहीत, ज्या भागात थेट नदी किंवा कॅनाल चे पाणी शेतीसाठी वापरले जाते अशा जमिनीत पीएच प्रमाण वाढलेले निदर्शनास येत आहे,  महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नद्यातील पाणी प्रदुर्शीत झालेले  आहे. याच पाण्यातुन मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे रासायनिक क्षार जमिनी येत आहेत, अनेक  जमिनी तर क्षारपड (बरबाद) झाल्या आहेत , द्राक्ष वेल ही याच गुंत्यात अडकत चालली आहे, परंतु कितीही किचकट गुंता असला तरीही तो गुंता सोडवण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नसनार आहे. एखादा महामार्ग जर छराब झाला असेल त्यावर खुपच खड्डे पडले असतील तर तात्पुरते दुसर्या मार्गाने जाणे हा तात्पुरता पर्याय झाला, परंतु जागा न बदलता तोच महामार्ग नविन बनवला तर तो शाश्वत ऊपाय ठरतो,  अगदी तसच शेतीमधे कितीही समस्या तयार झाल्या तरीही शेती करने सोडून देने हा काही  त्यावर ऊपाय नाही , आपली शेती करण्याची पद्धत  नक्कीच आपण बदलु शकतो.  म्हणुनच आपण पुढील भागांमधे " समृद्ध माती तरच शेती " या अभियानाला सुरवात करणार आहोत. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्


Posted Date - 26-09-2019

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ६

निसर्ग व वनस्पती हा सबंध खुप दृढ असला तरी सुद्धा निसर्गाच्या लहरी पणाचा फटका वनस्पती ला खुप सोसावा लागतो, निसर्गाच्या या स्वभावा मुळे वनस्पती स्वतःचे अस्तित्व टिकवुन ठेवण्याची सतत धडपड करत रहातात, वनस्पतींचा निसर्गावर मात करण्याचाच कल जास्त असतो व आपली स्वतःची नविन पिढी तयार करत असतात. (हेच मानव व इतर सृष्टीचे अन्न असते) आपण या पुर्वी च्या भागांमधे पाहिले आहे की द्राक्ष वेल भरपूर विश्रांती नंतरच परत नविन बहारासाठी सिद्ध होते, या विश्रांती काळातच बागेचे पोषन होणे गरजेचे असते, आता आपल्याला किती उत्पादन घ्यायचे आहे ते निच्छित करावे लागेल, पहिल्या बहारात किती उत्पादन मिळाले तेही महत्वाचे असते,  बर्याचदा पहिल्या बहारात जर जास्त उत्पादन मिळाले असल्यास पुढिल बहारात कमी उत्पादन मिळते व पहिल्यांदा कमी उत्पादन मिळाले असल्यास पुढिल बहारात जास्त उत्पादन मिळते  असाही अनुभव पहायला मिळाला आहे, परंतु खरड छाटणी नंतंर बागेची विषेश काळजी घेतल्यास नियमित एकसारखे उत्पादन घेता येने शक्य आहे, (बागेस अन्न पाणी, योग्य प्रकारे छाटणी ईं व्यवस्थापन ही महत्वाचे आहे). विश्रांती काळात प्रत्येक वेलीवर जातपरत्वे योग्य काडी संख्या व पाने शेवटपर्यंत निरोगी व धष्टपुष्ट असणे गरजेचे आहे, अर्धवट पोषनातुनच अनेक समस्या निर्माण होतात, द्राक्ष वेल रोग किडीस लवकर बळी पडणे, मालकाड्या अपक्व रहाणे, घड जिरने इत्यादी समस्यांना मग सामोरे जावे लागते, प्रत्येक वर्षी फळछाटणी पुर्वी द्राक्ष बागेतील मातीची प्रयोग शाळेत माती परिक्षण करणे गरजेचे आहे, आपल्या मातीत नेमके किती अन्नद्रव्ये आहेत मग इच्छीत उत्पादना साठी किती घटक द्यायचे ते ठरविने सोपे जाते. अनेक वेळा असेही पहायला मिळते की जमिनीत भरपूर प्रमाणात अन्न घटक आहेत परंतु ते पिकास ऊचलताच येत नाहीत किंवा ते घटक अविघटनशिल असतात, 15-20 वर्षापूर्वी ही समस्या फारच क्वचित ठिकाणी असायची परंतु आत्ता अनेक ठिकाणी हिच फार मोठी समस्या तयार झाली आहे. याची कारणेही अनेक आहेत माझ्या मते मोठे कारण जमिनीत वाढलेले अतिरिक्त व अविद्राव्य क्षार, खर तर भरपूर व नियमित हंगामी पाऊस पडल्यास हे क्षार जमिनीतुन निचर्यावाटे धुवून जायला हवेत (लिचआऊट) परंतु जमिनीत सेंद्रिय कार्बनच्या कमतरते मुळे व उपयुक्त जिवांणू च्या कमी संख्येमुळे जमिनी कडक व चिकट बनत चालल्या आहेत व मातीत क्षारांचे प्रमाण  हे वाढतच चालले आहे. जमिनीची विद्युत वाहकता (ई.सी.) वाढत चालली आहे. आपण पाठीमागील भागात पाहिल आहे द्राक्ष वेलीची पाने  सुर्यप्रकाश,  कार्बनडायऑक्साईड व पाणी यांच्या मदतिने स्वतःचे अन्न तयार करते, व वनस्पती ही प्रक्रिया करत असताना जमिनीतील घटक (एनपीके, सुक्ष्म व अतिसुक्ष्म) वनस्पती ला मदत करत असतात, (जमिनीतुन पुरवठा होत असलेल्या अन्नघटकांची वनस्पती ना तिच्या वेगवेगळ्या अवस्थां मधे सतत गरज असते) ईथेच एक परिणाम कारक घटना घडत असते , वनस्पती जो स्वतःसाठी अन्नसाठा तयार करत असते या प्रक्रियेत पानात, शेंड्यात व खोडात ऊर्जा तयार होत असते या ऊर्जेवर धनभाराचा प्रभाव जास्त असतो  (पॉझिटीव्ह चार्ज) हीच ऊर्जा पुढे मुख्य उत्पादनात बदलते. एका ठराविक अवस्थेनंतर ही ऊर्जा (विश्रांती काळ संपणे व ताण देण्याच्या अगोदर) वेलीच्या आंतरगत भागात साठवनुक करणे गरजेचे असते पण याच काळात जमिनीत निगेटिव्ह चार्ज सक्रिय असतो, व झाडातील बरिचशी धनभारित ऊर्जा जमिनीत निघुन जाते. (द्राक्षा पेक्षा इतर फळ पिकात ही समस्या जास्त आढळून येते आहे) सहज विद्युत वाहक धातुजन्य घटक मुळांच्या जवळ गरजेपेक्षा जास्त प्रमाणात साठल्यामुळे च द्राक्ष वेलीत कमी प्रमाणात अन्न साठा शिल्लक रहातो,  आणि मग तिथुनच द्राक्ष बागांची कसरत चालू होते. फुट एकसारखी न होने, वांझ फुटींची संख्या वाढने,  घड जिरने किंवा रोग किडी बळावने या सारख्या कुठल्या ना कुठल्या प्रकारात द्राक्ष वेल  बळी पडत रहाते. यावर एकच ऊपाय आहे आणि तो म्हणजे माती समृद्ध करणे. "समृद्ध माती तरच शेती" भविष्यात द्राक्ष बागांसमोर हेच एक आव्हान असनार आहे.  

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्     


Posted Date - 26-09-2019

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ५

बहुवर्षायु वनस्पतींचे बहार येणे किंवा नियमित  उत्पादन देणे हे हवामानात होणारे बदल  व भौतिक परिस्थितीत होणारे प्रचंड टोकाचे बदल यावर अवलंबून असते . वनस्पतींना जर फारच सुखदायक हवामानात, अखंड व नियमित पाणी अन्न मिळत राहिले तर त्या वनस्पती कमी किंवा अनियमित उत्पादन (फुले, फळे,  बिया इत्यादी) देतात. अगदी ऊदाहरणच द्यायचे झाल्यास कोकणात पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो इतका पाऊस पडतो की जमिनीत ऊपलब्ध असनारी बरिचशी अन्नद्रव्ये अती निचरा होऊन वाहून जातात पण पावसाळा संपला की त्याच कोकणात अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते, एवड्या कमालीची विषम परिस्थितीतही तेथिल आंब्याला नियमित बहार येतो व भरपूर उत्पादन मिळते.  इकडे देशावर म्हणजेज पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी अधिक प्रमाणात होतो पावसाळा संपला तरी पाणी परिस्थिती चांगली असते पण इकडच्या आंबा बागांना नियमित बहार येत नाही (काही आंबा झाडांना एक वर्ष आड आंबा लागतो) याच खास  कारण म्हणजे आपल्याकडील  आंबा झाडांमधे निगेटिव्ह चार्ज  चा प्रवाह नियमित जास्त काळ  चालूच रहातो व कोकणात मात्र निगेटिव्ह चार्ज चे रूपांतर निगेटिव्ह फोर्स मधे लवकरच होत असते. आता हा निगेटिव्ह फोर्स द्राक्ष वेलीवर कसे काम करतो पाहूया, खरड छाटणी नंतर बागेस भरपुर अन्न व पाणी देऊन निगेटिव्ह चार्ज नियमित केला जातो (मुळे सक्रिय केली जातात तेव्हाच जमिनीतुन अन्न पाणी वर सरकते) तेव्हाच नविन काड्या व अन्नद्रव्ये साठवूनक करणारी पाने तयार होतात. याच काळात भरपुर व नियमित सुर्यप्रकाशाची ही गरज असते याच काळात मुळे प्रचंड आक्रमक झालेली असतात. याच काळात द्राक्ष वेलीस आवश्यक असणारी अन्नद्रव्ये पुरवठा करणे गरजेचे असते, जेवढा निगेटिव्ह चार्ज चा प्रवाह जास्त काळ राहिल त्याच प्रमाणात मालकाड्या तयार होणे व पुढे उत्पादन किती तयार होने हे अवलंबून असते. द्राक्ष बागेत  साधारणपणे 120 ते 135 दिवस ही प्रक्रिया चालु असावी लागते. सुरवातीचा काळ म्हणावे खरड छाटणी नंतर बागेची काडी निर्मिती होत असताना जर हवामानात थोडाही फरक पडल्यास किंवा ढगाळ वातावरण, अकाली पाऊस पडल्यास लगेच थेट पहिला परिणाम हा द्राक्ष मुळीवर  होत असतो, पान देठात तयार होणारा धन भार मंदावतो परिणाम निगेटिव्ह चार्ज चा प्रवाह थांबतो परिणामी मुळीचे कार्य अचानक बंद पडते प्रसंगी द्राक्ष वेल आजारी सुद्धा पडते (डाऊणी, करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो) पुढे याच कारणामुळे घड जिरन्याची समस्या तयार होते. (एसव्हि किटोन याच काळात नियमित वापर झाल्यास म्हणजे जमिनीतुन व पानांवाटे वापरल्यास ते द्राक्ष मुळांना काम तात्काळ काम बंद करू देत नाही,  वनस्पती च्या याच संस्थेत किटोन खुबिने काम करते). थोडक्यात काडी पक्व होईपर्यंत मुळीचे काम विनासायास सुरळीत चालणे गरजेचे असते. पुढिल फळ छाटणी च्या अगोदर 15 ते 20  दिवस बागेस अन्न पाण्याचा  ताण द्यावा म्हणजे काडीवरिल डोळ्यामधे घड निर्मिती होते,  याच ताण देण्याच्या काळात द्राक्ष वेलीत प्रचंड बदल चालु होतात, (ताण देने म्हणजे अचानक पाणी देने बंद, खत देण्यासाठी बेड वर खड्डे पाडने, बेडवरिल माती मोकळी करने इत्यादी) जवळपास  4 -5 महिने द्राक्ष वेल मजेत असते मुळे चांगली सक्रिय असतात आणी अचानक हे सगळे चोचले बंद होतात,  द्राक्ष वेलीची मुळे कोरडी पडतात अन्न पाणी पुरवठा बंद होतो (मुळाना एक प्रकारचा झटका बसतो) द्राक्ष वेल याच काळात जगण्यासाठी प्रचंड धडपड करते, पाने, काडी व खोडात धन भार सक्रिय असतो पण तो धन भाराचा प्रवाह जमिनीकडे पोहचू शकत नाही, अतिशय क्षीण झालेल्या निगेटिव्ह भारामुळे पाने व शेंड्याकडून आलेली द्रव्ये मुळांपर्यंत येऊन थांबतात व हा प्रवाह वेग अचानक थांबतो यालाच निगेटिव्ह फोर्स म्हणावे लागेल. (या सगळ्या धडामोडी अतिशय वेगाने व कमी कालावधित घडते) शेंडा व पाने पोषन होत असताना यातीलच काही द्रव्ये व प्रक्रियेतुन तयार झालेली ऊदासीन द्रव्ये व धन भारित अन्न कण मुळीवाटे जमिनीत परत सोडत असतात परंतु निगेटिव्ह फोर्स मध्ये मुळी काम करणे बंद झालेली असते (निगेटिव्ह भार कमी झाल्यामुळे) मुळी पांढरी व कोवळी न रहाता ती तपकिरी व जून झालेली असते, या मुळीत याच काळात अनेक प्रकारचे  क्षार व काही विषारी द्रव्ये जमा झालेली असतात (गार्बेज एन्झाईम्स) अगदी याच काळात द्राक्ष वेल पुनरुत्पादनाकडे वळते व परिणामी काडीवरी डोळ्यात घड निर्मिती होते,  मगच या द्राक्ष वेलीकडून इच्छीत उत्पादन घेता येणे सहज शक्य  होते. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्


Posted Date - 26-09-2019