डाळिंबावरील तेल्या रोग:

Oily spot of Pomegranate-

Causal agent- Xanthomonas axonopodis pv. punicae

डाळिंबावरील तेल्या रोगाची झाडांना लागण होण्याची कारणे :

१. तापमान २८ ते ३२ अंश सेल्शिअस असताना

२. हवेतील आद्रता ७० % पेक्षा जास्त असणे

३. तेल्याग्रस्त मातृवृक्षापासून तयार रोपांपासून लागवड केल्यास 

४. नत्रयुक्त खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर

 • नत्राचा वापर करताना पावसाळी वातावरणात हवेतून/ पावसाच्या पाण्यातून पिकांना मिळणारे नत्र गृहीत धरावे.
 • जमिनीमध्ये असणाऱ्या जिवाणूद्वारे स्थिर होणारे नत्राचे प्रमाण गृहीत धरावे
 • नदी किंवा कॅनाल चे पाणी वापरात असाल तर अश्या पाण्यातून पिकाला मिळणारे नायट्रेट चे प्रमाण गृहीत धरावे

५. जमिनीतील क्लोराईड चे प्रमाण गरजेपेक्षा जास्त असणे.

 • पाण्याद्वारे जमिनीत वाढणाऱ्या क्लोराईड चे प्रमाण/ खताद्वारे दिले जाणारे क्लोराईड चे प्रमाण व जमिनीत वाढलेले क्लोराईड चे प्रमाण तपासावे

६. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.६ पेक्षा कमी असणे

 • रासायनिक खतांचा जास्त वापर
 • सेंद्रिय खतांचा कमी वापर
 • जमिनीमध्ये कमी होत चाललेली जिवाणूंची संख्या 

७. झाडांना होणाऱ्या जखमा 

 • छाटणी केल्यानंतर झाडांना होणारी जखम
 • शेंडे किंवा वॉटरशूट काढल्यानंतर झाडांना होणारी जखम
 • शेतीची अवजारे जसे कि ब्लोवर, ट्रॉली इतर अवजारे यामुळे झाडांना होणारीजखम
 • गारपीट झाल्यानंतर गारांमुळे झाडांना होणारी जखम,
 • जास्त नत्रामुळे लुसलुशीत झालेली पाने व फळे (हि पण एक जखमच म्हणावी लागेल)

८. निमॅटोड (सूत्रकृमी) च्या प्रादुर्भावाने किंवा अपुऱ्या पोषणाने झाडे कमकुवत असणे.

९. शेतात वापरण्यात येणारी रोगग्रस्त अवजारे, जसे की छाटणीसाठी वापरण्यात येणारी कात्री.

 

एस व्हि ऍग्रो सोल्युशन्स तेल्या नियंत्रण उपक्रम:

 • वरील बाबींचा विचार करून बाहार धरताना काय करावे व काय करू नये याचे वेळापत्रक तयार करावे
 • छाटणी करण्याच्या कात्री निर्जंतुक करून घ्यावे
 • नवीन लागवड करताना ज्या बागेमध्ये रोपे तयार केली आहे त्याचा इतिहास तपासावा, तेल्याग्रस्त बागेत तयार केलेली रोपे लागवडीसाठी वापरू नयेत.
 • वर दिल्याप्रमाणे छाटणी झाल्यानंतर, शेंडे काढल्यानंतर किंवा इतर कारणाने झाडांना जखम झाल्यास त्वरित एस व्हि राउंडर पी २.५ ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करावी.
 • पहिले पाणी देताना राऊंडर पी जमिनीतून देणे: निमॅटोडच्या (सूत्रकृमी) नियंत्रणासाठी, जमिनीतील तेल्याच्या जिवाणूंच्या नियंत्रणासाठी तसेच झाडांची रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी.)
 • फळांचा रंग बदलण्याच्या अवस्थेमध्ये जसे कि फळ हिरवे होताना एकदा व फळ शेंदरी रंगाचे होताना  एकदा एस व्ही राउंडर पी १ किलो आणि एस व्ही एक्झिटम १ किलो प्रति एकर या प्रमाणात जमिनीतून सोडावे.
 • तेल्याग्रस्त बागेमध्ये आद्रता वाढल्यानंतर, तेल्या रोगाच्या जीवाणूंसाठी पोषक वातावरण असताना एस व्हि राउंडर पी + राऊंडर एल, एस व्हि डिफेन्स च्या आलटून पालटून फवारण्या घ्यावी.
 • झाडांना दिले जाणारे नत्राच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे (वर दर्शविल्याप्रमाणे सर्व बाबींचा विचार करावा)
 • हिरवळीची खते, उसाच्या पाचटाचे आच्छादन करावे.
 • जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी उपाय योजना कराव्यात, सेंद्रिय घटकांचा, शेणखताचा वापर वाढवावा तसेच  बेसल डोस मध्ये एस व्हि फ्रुटर एकरी १०० ते १५० किलो चा वापर व एस व्हि ५९ + एस व्हि के ड्रीप च्या वापराने जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.
 • जमिनीतील वाढलेले क्षारांचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी एस व्हि टर्मिनस १ लिटर एकरी २ महिन्यांतून एकदा जमिनीतून द्यावे.
 • चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांचे मुळांद्वारे शोषण कमी होते, तरी अश्या जमिनीत गंधक, स्फुरद, मंगल यांची वाढीव मात्रा द्यावी.
 • तेल्याग्रस्त बागेत सुरुवातीपासून एस व्हि ऍग्रो च्या वेळापत्रकाचा अवलंब केल्यास तेल्या रोगाचे प्रमाण कमी करता येते. 

Posted Date - 26-09-2019

क्षारयुक्त जमीनीचे पाणी व्यवस्थापन

काळ्या खोल जमिनीमध्ये द्राक्ष पाणी व्यवस्थापन
क्षारयुक्त जमीनीचे व्यवस्थापन-
 द्राक्ष बागेस पाणी किती द्यावे हे फार महत्वाचे असते, सर्वसाधारण जमिनीचा प्रकार पाहून पाणी द्यावे लागते. जमिन काळी भारी प्रकारची असल्यास पाणी हलक्या मध्यम जमिनीपेक्षा कमी द्यावे लागते,  परंतू अशी काळी व भारी जमिनीचे ही दोन प्रकार पडतात, (पुर्वी नव्हते) एक जमिन पाण्याचा चांगला निचरा करू शकते व दुसरी काळी व भारी खोलीची असुनही पाण्याला अजिबात खाली निचरा करू देत नाही. याच कारणही तसेच आहे, बागेस नियमित वापराचे पाणी क्षारयुक किंवा अती क्षारयुक असल्यास हे क्षार अशा जमिनीत एका ठराविक खोलीवर जाऊन अडकून पडतात व नंतर परत परत पाण्यातुन आलेले नविन क्षार पहिल्या क्षार कंणाना चिकटतात, पावसाळ्यात भरपूर पाऊस झाल्यास हे क्षार  धुवून सुद्धा जातात,  परंतू या वर्षी तेवडा मोठा पाऊस झालेला नाही त्यामुळे अशा अनेक काळ्या जमिनीमधे ही समस्या पहायला मिळते आहे,  काळ्या जमिनीमधे सोडीयम चे क्षार जास्त प्रमाणात साठून जमिनीची निचरा क्षमता कमी होते तर चुनखडीयुक जमिनीत  कॅल्शियम कार्बोनेट च्या जास्त क्षारामुळे पाण्याचा निचरा कमी होतो. काळ्या जमिनीमधे   सोडीयम चे क्षार जास्त प्रमाणात असल्यास अशा जमिनीत भरपूर जिप्सम चा वापर करण्याची शिफारस केली जाते परंतु हा जमिनीचा निचरा वाढविण्याचा तात्काळ ईलाज नाही. हा प्रयोग बाग विश्रांती काळात असताना फायदेशीर ठरतो, जास्त चुनखडी असलेल्या जमिनीत एकरी 50 किलो गंधक दिल्यास अश्या जमिनी चा निचरा वाढतो. या शिवाय काळ्या जमिनीमधे द्राक्ष बागेस  पाणी बागेच्या अवस्थे नुसार द्यावे लागते, अशा जमिनीला विश्रांती काळात एकरी 5000 लिटर आठवड्यातून दोनदा, एप्रिल छाटणी नंतर एकरी 17500 ते 18000 लिटर दररोज व ऑक्टोबर छाटणी नंतर पहिल्या फुटीच्या वेळेस दररोज  एकरी 4000 ते 6000लिटर व घड वाढीच्या अवस्थेत एकरी 10500 ते 18000 लिटर  पाणी द्यावे लागते, (हे पाणी देताना अनावश्यक फुटी किती फुटतात हे पाहूनच पाण्याचे नियोजन करावे लागते) अनेकदा काळ्या जमिनीमधे पाण्याचा निचरा होत नसल्यास अशा जमिनीत विविध जिवाणू व सेंद्रिय घटक फारच कमी आहेत असे समजावे, जमिनी भरपूर सेंद्रिय घटक व जिवाणूयुक्त असल्यास जमिनीचा निचरा ऊत्तम राहतो व अशी जमिन पोकळ व भुसभूशीत असते. अशा जमिनीत थोडे फार जास्त पाणी झाले तरीही ऊत्तम निचर्या मुळे बाग पिवळी पडत नाही, परंतू काळ्या जमिनीमधे निचरा होतच नसेल तर तात्काळ उपाययोजना करावी लागेल, एकरी 150 किलो एसव्हि फ्रुटर ड्रिपर खाली एक इंच मातीआड करावे व एकरी दोन लिटर एसव्हि59 + दोन लिटर एसव्हिके ड्रिप एकत्र करून ठिबक मधून सोडावे, यातील प्रचंड मोठ्या संख्येने आलेले जिवाणू लगेच कामाला लागतात या जिवाणू ना एसव्हि फ्रुटर मधून भरपूर खाद्य ऊपलब्ध झाल्यामुळे ते जिवाणू वेगवान हालचाली करून जमिन पोकळ करतात ,  चार आठ दिवसात या जमिनीत गांढूळाची संख्या वाढायला लागते व फारच कमी वेळात जमिनीचा निचरा चमत्कार झाल्यासारखा वाढतो, जमिनीत अडकलेले अतिरिक्त क्षार विरघळले जातात व द्राक्ष वेलीस जमिनीत असणारी अन्नद्रव्ये सहज ऊचलुन घेता येतात व जमिनीच्या आरोग्या बरोबरच चांगल्या दर्जाच्या द्राक्ष घडांची निर्मिती करणेही सहज सोपे होऊन जाते.  

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्    


Posted Date - 26-09-2019

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग २२

नमस्कार शेतकरी बंधूनो,  
बऱ्याच वेळा द्राक्ष बागांना प्रचंड थंडीचा सामना करावा लागतो, अगदी बर्फ तयार होण्याइतपत तापमान खाली येते, या प्रचंड थंडी मुळे माझ्या द्राक्ष बागेचे काही नुकसान तर होनार नाही ना या चिंतेने शेतकरी बंधू धास्तावतात, आणी बागेचे संरक्षण करण्याच्या नादात चुकिची उपाययोजना केल्यास प्रसंगी नुकसान होऊ शकते, हे नुकसान होऊ नये म्हणून अती थंडी तापमानात द्राक्ष बागेवर काय परिणाम होतात हे आपण आज पाहणार आहोत.  सर्वसाधारणपणे पाण्याचे किंवा दवबिंदूचे बर्फात रूपांतर होण्यासाठी हवेतील सापेक्ष तापमान से 4 अंश डिग्री सेल्सियस च्या खाली आले तरच बर्फ तयार होण्याची प्रक्रिया चालू होते. साधारणपणे तपमान 4 अंशाच्या खाली रात्रभर नसते, पहाटे पाच वाजल्या नंतर तापमान वेगाने खाली येते, आपल्याकडे अगदी पहाटे  साडेपाच  ते सात या वेळेतच पाणी व दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया होते व व नंतर सुर्योदयानंतर हळूहळू तपमान वाडायला सुरवात होते, द्राक्ष वेलीवर इतक्या कमी तपमानाचा निच्छितच परिणाम होतो, मुळांचे काम मंदावते, व घडातील मणी सुद्धा फुगवन थांबते, काही पानांवर व मण्यांवर  दव गोठून बर्फ दिड तासा पेक्षा जास्त काळ साठून राहिल्यास अश्या भागावर करपल्याचे डाग पडतात, द्राक्ष वेलीची चयापचय क्रिया मंदावते परंतु थांबत नाही, प्रकाशसंश्लेषन क्रिया मात्र चालूच रहाते, याच कारण म्हणजे आपल्याकडे पाणी गोठण्याची क्रिया संपूर्ण दिवसभर नसते, पहाटे पासून सकाळी आठ पर्य॔तच ही अवस्था टिकते व दिवस भर जरी तापमान कमी असले तरी गोठन बिंदू इतके नसते सुर्यप्रकाशाचा कालावधी मात्र कमी झालेला असला तरी पाणी , कार्बन डाय ऑक्साईड  व सुर्यप्रकाश मिळून कर्बोदके ( शर्करा CHO ) निर्मिती ही धिम्या गतीने चालूच रहाते, याचा एक परिणाम असा होतो की द्राक्ष मण्यांमधे पेशी विभाजन थांबते, क्वचित प्रसंगी विकृती ही येऊ शकते, मणी फुगवन संथ गतीने होते, साखर निर्मिती मंदावते, आंथ्रोसायनिन चे प्रमाण वाढून आम्लता वाढते व मणी आंबट बनायला सुरवात होते, याच काळात विनाकारण रासायनिक खतांचा भडिमार केल्यास मणी तडकण्याची क्रिया चालू होते, कारण मुळांचे कार्य मंदावलेले असते, त्या मुळे अन्नद्रव्ये पुरवठा होत नाही, याचा अर्थ असा असतो की मणी फुगवन वेग मंदावतो व द्राक्ष तयार होण्यासाठी लागणारा कालावधी हा लांबतो, बस इतकेच  हे सर्व टाळायचे असल्यास उपाययोजना करता येईल,  ती पुढील प्रमाणे,दवबिंदू गोठतात ते पहाटे साडेपाच  ते सात या वेळेतच याच वेळेत बागेत धुर तयार करावा व ठिबक संच ही चालू करून पाणी देत रहावे,  सकाळी विहरिचे किंवा शेततळ्याचे पाणी गरम असते व धुरा मुळे बागेतील तापमान गोठनबिंदूच्या खाली येत नाही अगदी बागेत वेगवेगळ्या अंतरावर चार पाच ठिकाणी शेकोटी करून धूर केल्यास त्या बागेत दवबिंदू गोठणार नाही, व बर्फामुळे पानांना होणार्या इजा व डाग पडणार नाहीत, हा प्रकार रोज पाच सहा दिवस कंटिन्यु करावा लागेल, कारण दव गोठण्याइतपत कमी तपमान जास्त दिवस टिकत नाही, एसव्हि किटोन चा फवारणी व ड्रिपमधून वापर केल्यास प्रकाशसंश्लेषन क्रिया चालुच राहील, अधून मधून अल्प प्रमाणात एनपिके फवारणी मधूनही देता येइल, याच काळात एसव्हि फ्रुटर चा ड्रिप खाली वापर केल्यास मुळे एवढ्या कमी तपमानात सुद्धा कार्यक्षम राहतील, खरे तर याच काळात मुळांवर निगेटिव्ह चार्ज असायला हवा आहे, तो चार्ज एसव्हि फ्रुटर बेमालूमपणे तयार करते, अगदी त्याच वेळी फवारणी मधून पानांवर पाॅजिटिव्ह चार्ज  तयार करायचे काम एसव्हि किटोन + चिलेटेड मिक्स मायक्रो न्युट्रियंट किंवा 13:00:45 किंवा 19:19:19 अल्प प्रमाणात तयार करेल. पाने, मुळे, व मण्यांची फुगवन व शर्करा निर्मिती चालू राहील,  व अती थंडीत सुध्दा आपली बाग सुरक्षित राहू शकेन. सविस्तर उपाययोजना पुढिल प्रमाणे करता येईल, एकरी 100 किलो एसव्हि फ्रुटर ड्रिपरखाली टाकून रोज पहाटे साडेपाच ते सात या वेळात कमी दाबाने पाणी देने, दुसर्या दिवशी एकरी पाच लिटर एसव्हि साईज बिल्डर सोडने, फवारणी साठी 200 लिटर पाण्यात 250 मिली एसव्हि किटोन + 100 ग्राम चिलेटेड मिक्स मायक्रो न्युट्रियंट + 300 ग्राम 13:00:45 एकत्र मिसळून फवारणी करावी, तीन दिवसांनी एकरी एक एक लिटर एसव्हि किटोन ड्रिपमधून सोडावे, म्हणजे मण्यांमधे कुठलिही विकृती न येता अती थंडीतही फुगवन चालूच राहील.  

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स् 


Posted Date - 26-09-2019

द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग २१

द्राक्ष मण्यातील विकृती
पिंक बेरीज-
साधारणत : द्राक्षात पाणी उतरायला लागल्यावर गुलाबी मणी दिसायला सुरुवात होते. असे मणी काहीसे आकाराने लहान असतात. द्राक्षे जशजशी पिकत जातात. तसतसा हा रंग अधिक गर्द होत जातो. ही द्राक्षे आधी आकर्षक दिसत असली तरी, बाजारात पोहचेपर्यंत गर्द लाल व काळसर रंगाची होतात, त्यांची चमक जाते. 
पिंक बेरीज होण्याची कारणे: 
अॅन्थोसायनिन नावाच्या द्रव्यामुळे पिंक बेरीज होतात. हे बऱ्याच फळांत, फुलांत आणि पानांत सुद्धा आढळून येत असते. पेशीचे जे व्हेस्क्युलर सॅप असतात त्यात हे आढळते. जास्त पीवळे  असलेल्यामध्ये हा द्रव घातल्यास त्याचा रंग गर्द होतो. म्हणून काही फुलांचा रंग गर्द करण्यासाठी अमोनियम हायड्रोंक्साईडची वाफ देतात.
अॅन्थोसायनिनची रासायनिक प्रक्रिया होणाऱ्या कागदावरील आलेख केल्यावर असे आढळून आले की याचे चार प्रकार आहेत.
१) सायनाडीन,२)माल्व्हीडीन, ३)पिनोनिडीन, ४)मनोग्लुकोईज,ह्यातला पिनोनिडीन जास्त प्रमाणात असतो. बाकीचे अगदी अल्प प्रमाणात असतात. मुख्यत : नैसर्गिक चार घटकांची क्रिया अॅन्थोसायनिन तयार होण्यावर होते. तापमानातील चढउतार, तीव्र सुर्यप्रकाश, नत्राची कमतरता, फॉस्फरसची कमतरता. झाडाच्या पेशीमध्ये साखर जेव्हा जलद गतीने जास्त प्रमाणात तयार होते, तेव्हा ते अॅन्थोसायनिन तयार व्हायला उत्तेजन देतात. नत्राच्या पुरवठ्याने साखर नत्रजन्य पदार्थात रूपांतरित होते आणि साखरेची तीव्रता कमी होते. त्याचबरोबर अॅन्थोसायनिन कमी होते. मण्यात पाणी उतरतांना इथ्रेल वापरल्याने अॅन्थोसायनिन वाढतात. 
उपाय योजणा:
१) २५० ग्रॅम अॅस्कोर्बिक अॅसिड २०० लिटर पाण्यात घालून फवारावे. दुसऱ्या दिवशी ५०० ग्रॅम सोडियम डायथील डिथोकार्बोमेट प्रती २०० लिटर पाण्यात घालून फवारावे. अशा २- ३ फवारण्या ८ दिवसांच्या अंतराने कराव्यात, मात्र ह्या रसायनांचा एकरी खर्च जास्त असतो.
२) ५ ग्रॅम युरीया व २ ग्रॅम बोरीक अॅसिड प्रती १ लिटर पाण्यातून फवारल्यास शेंदरी मणी कमी होण्यास मदत होते.
३) एकरी १३ किलो बोरॅक्स एप्रिल छाटणीनंतर जमिनीतून दिल्यास ही विकृती लक्षणिकरित्या कमी होऊ शकते.

मणी हिरवे राहणे : (दाढेमणी)
या विकृतीमध्ये द्राक्ष पिकायला सुरुवात झाल्यानंतर घडाच्या शेंड्याकडील तसेच फांद्याकडील काही मणी पिकत नाही व ते मणी सुरकतले जाऊन गळून पडतात. जसा घड पिकत जाईल तसा या विकृतीचा प्रादुर्भाव वाढत जातो. अशा विकृती ने ग्रासलेले मणी गोडीला फार कमी असतात. तसेच त्यामध्ये गर नसतो. ही विकृती थॉम्पसन सिडलेस या जातीत मोठ्या प्रमाणात दिसून येते.  कारणे : १) मण्यांच्या वाढीच्या काळात वेलींना पाण्याचा ताण पडला असल्यास. २) बोरॉन सारख्या मुलद्रव्यांनी कमतरता पडल्यास. ३) रासायनिक खतांचा वाजवीपेक्षा जास्त वापर केल्यास. ४) ज्या बागेत पाण्याचा योग्य निचरा होत नाही व चुनखडीचे प्रमाण जास्त आहे, तेथे ही विकृती मोठ्या प्रमाणात दिसून येते.
५) घडांना कॅल्शियमचा पुरवठा कमी झाल्यास.
६) वेलींवर प्रमाणापेक्षा जास्त घड ठेवल्याने सर्व घड योग्य पोसले न गेल्याने
७) घडाच्या पुढे पाने कमी ठेवली असल्यास.

उपाय  १) खरड छाटणीनंतर प्रत्येक वेलीवर काड्यांची संख्या मर्यादित ठेवली पाहिजे.
२) ऑक्टोबर छाटणीनंतर वेलीवर घडांची संख्या मर्यादित ठेवावी.
३) घडाचा शेंडा खुडणे व विरळणी वेळेवर करावी.
४) जी. ए. चा वापर काळजीपूर्वक करावा व वाढीव प्रमाणात जी. ए. वापराचा मोह टाळावा.
५) बागेत पाण्याचा योग्य निचरा केला पाहिजे.
६) पालाश, बोरॉन, कॅल्शियम व मॅग्नेशियमसारख्या मुलद्रव्यांचा योग्य पुरवठा करावा.
७) घडांच्यापुढे पाने कमी राखल्यास घडांस अन्नाचा तुटवडा पडतो व घडांचे योग्य पोषण होत नाही.
८) पानातुन तसेच जमिनीतून सुक्ष्म मुलद्रव्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा. योग्य  व्यवस्थापन केल्यास आपण द्राक्ष मण्यातील विकृती टाळू शकतो. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्  


Posted Date - 26-09-2019