॥ कृषक हिताय । मृदा संवर्धनाय

Posted Date - 06-10-2019

कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या भारत देशात आज आपला शेतकरीच पोरका होत चाललाय. सव्वाशे कोटी लोकसंख्येचे पोट भरता भरता आपला शेतकरी राजाच उपाशी राहू लागलाय. गेल्या वीस वर्षात एकट्या महाराष्ट्रातच तीन लाख शेतकरी बंधूंनी आत्महत्या केल्या आहेत आणि याच मुख्य कारण जमिनीची नापिकी आहे. रासायनिक शेती पद्धतीमुळे जमीन तर नापीक झालीच परंतु याच रसायनांमुळे सर्वच जनतेचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी अतिरिक्त रसायनांचा वापर वाढला आहे. याचा परिणाम जमिनी क्षारयुक्त व कडक झाल्या आहेत. पिकांवर सुद्धा रोग व किडींचे प्रमाण जास्त वाढले आहे. परिणामी शेतीमाल आता दर्जाहीन व कमी उत्पादन घेत आहे. गेल्या वीस वर्षात जमिनीचे होत गेलेले स्थितंतर पाहत आलो आहे. हि परिस्थिती वेगाने बदलणे गरजेचे आहे. जगातील अनेक देशांनी आपल्या शेतीपद्धती मधून मानवी आरोग्यास घातक असलेली रसायने हद्दपार केळी आहेत, चांगली सेंद्रिय शेती पद्धती (तंत्रज्ञान) विकसित झाली तरच हि परिस्थिती बदलता येणे शक्य होईल. हा विचार करून गेल्या दहा वर्षात आम्ही स्व-संशोधित एसव्ही-इको-नॅनो तंत्रज्ञान विकसित करण्यात यशस्वी झालो आहोत. १००% सेंद्रिय शेती निविष्ठा स्वतः निर्मिती करत आहोत. आता रसायनांचा कमीत कमी वापर करून उत्कृष्ट दर्जाचे व निर्यातक्षम शेती उत्पादन घेणे सहज सोपे झाले आहे. आमची एसव्ही अॅग्रो सोल्युशन्स हि कंपनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व काळी आई वाचवण्याच्या अभियानामध्ये अर्थात “कृषक हिताय मृदा संवर्धनाय” सतत शेतकऱ्यानसोबत कटीबद्ध आहे. आपला श्री सुभाषचंद्र कराळे. (एव्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स प्रा.लि.संचालक, डाळिंब, द्राक्ष व इतर फळ पिके सल्लागार, सेंद्रिय फळबाग तज्ञ, )