द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १८

Posted Date - 26-09-2019

नमस्कार शेतकरी बंधूनो, बऱ्याच वेळा द्राक्ष बागायतदारांना ऐन फुगवनीच्या काळात कमी तापमानाचा सामना करावा लागते,  कमी तापमानामुळे मणी क्रॅकिंग ची समश्या येऊ शकते.   किमान  तापमानात म्हणजे 15 अंश डिग्री सेल्सियस च्या खाली तापमानात  द्राक्ष वेलीची मुळे काम करणे बंद करतात, पाने प्रकाशसंश्लेषन करण्याचे काम बंद किंवा कमी करतात, कमी तपमानामुळे हवेतील कार्बन डाय ऑक्साईड जमिनीलगत च रहातो व (15 अंश डिग्री सेल्सियस पेक्षा कमी तपमानात कार्बन डाय ऑक्साईड चे वजन ईतर वायुंपेक्षा जास्त वाढते व तो रात्री चे वेळी पानांपर्य॔त पोहचतच नाही) प्रकाशसंश्लेषन क्रिया बंद होते  परिणामी द्राक्ष वेलींच्या पानांकडून नविन अन्न निर्मिती थांबते आपण पाठीमागील एका भागात  वाचलेही असेल पानांकडून संकेत मिळाल्यावरच मुळे जमिनीतील घटक शोषून घेतात व पानांकडे पोहचवत असतात अगदी त्याच वेळी पानांकडून ही एक प्रवाह मुळांकडे जात असतो, याच प्रक्रिये दरम्यान पानांकडून तयार झालेले अन्न (कर्बोदके) खोडात तात्पुरते साठवले जाते  व परत ते अन्न साठवण्यासाठी घडांकडे पाठवले जाते. परंतू नेमके कमी तपमानात (15 पेक्षा कमी) पानांकडून कर्ब ग्रहन करण्याचे काम मंदावते, याचा अर्थ असा होतो की घड व मणी फुगवन होणे, उर्जा निर्मिती कार्य मंदावते, परंतू घड व मणी मात्र खोड वलांडा व काडीत साठवलेले पाणीच स्वतःकडे ओढुन घेत असतात परंतु याच काळात घडांचा विकास व मणी फुगवन होण्यासाठी फक्त पाणी च नाही तर अनेक प्रकारची अन्नद्रव्ये ( खनिजे ) लागतात व या अन्नद्रव्यांना व्यवस्थापित करण्यासाठी विविध प्रकारची संप्रेरके मदत करत असतात. ही साखळी मात्र कमी तपमानात विस्कळीत होते व मण्यावरील साल अर्थात त्वचा वाढने बंद होते व आतील गरात फक्त पाणी साठा वाढत जातो परिणामी असे मणी फाटतात व यालाच क्रॅकिंग म्हणतात. काही द्राक्ष बागांमधे खोड व ओलाड्यांमधे गरजेपेक्षा जास्त अन्नद्रव्ये साठविलेली असतात यालाच स्टोअरेज किंवा राखीव अन्नसाठा असे म्हणतात. असे स्टोअरेज असलेल्या द्राक्ष वेलीवर लगेच कमी तापमानाचा परिणाम होत नाही. या परिस्थितीत द्राक्ष बागांचे थंडी पासून  संरक्षण  करावे लागते, अगदिच तपमान  फारच कमी म्हणजे सात आठ सेल्सियस इतके खाली आल्यास बागेत रात्री शेकोट्या पेटवुन घूर करावा म्हणजे बागेत थोडे ऊबदार वातावरन तयार होइल, मुळावाटे अन्नपुरवठा होत नसल्यास  कृत्रिम रित्या  पानांवर फवारणी मधून लागणारी अन्नद्रव्ये द्यावीत, बाग 50-60 दिवसांची झाली असल्यास फवारणी मधून 12:61:00 दोन ग्राम + एसव्हि किटोन सव्वा मीली ने घ्यावे,  मणी पाणी ऊतरण्याच्या टप्प्यावर असताना एक वेळ मॅग्नेशियम सल्फेट 3 ग्राम + एसव्हि  किटोन सव्वा  मिली ने फवारणी करावी, व एक वेळ चिलेटेड मिक्स मायक्रो न्युट्रियंट 1 ग्राम + एसव्हि किटोन सव्वा मिली ने फवारणी करावी , शक्यतो बागेस पहाटे पाणी द्यावे, तापमान रोजच्या पेक्षा कमी होत असल्यास द्राक्ष बागेस एकरी एक लिटर एसव्हि किटोन + एक लिटर एसव्हि काॅफेझ  ड्रिपमधून सोडावे म्हणजे घड ताबडतोब नरम व लवचिक होतील व सहसा क्रॅकिंग होनार नाही. तथापी द्राक्ष वेल ऑक्टोबर छाटणी पुर्वी च भरपूर स्टोअरेज ने संपृप्त असावी या साठी ही तयारी एप्रिल छाटणी पासूनच नियोजन काटेकोरपणे करावे लागेल. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्