द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १३

Posted Date - 26-09-2019

दर्जेदार द्राक्ष निर्मिती करणे ही  अनेक द्राक्ष उत्पादनकांची इच्छा असते. परंतु या अश्या निर्मिती साठी आपली जमिन समृद्ध असली पाहिजे हे विसरून चालणार नाही. अनेक शेतकरी बंधू हीच बाब रितसर विसरून जातात व जमिनीच्या आरोग्याचा विचार न करता मातीत नेमके काय हव हे पाहत नाहित व फक्त विविध रसायनांचा च वापर करून द्राक्ष उत्पादन घेतात, फक्त रसायनांच्या मदतिने ही द्राक्ष उत्पादन येते परंतु विषेश दर्जेदार द्राक्ष निर्मिती होत नाही. या साठी सर्वात पहिले जमिनीतील मृदा रसायनशास्त्र समजून घेने महत्वाचे आहे. पाठीमागील एका भागात आपण सेंद्रिय कार्बन कसा तयार होतो हे पाहिले आहे, याचे जमिनीत किती प्रमाण हवे तेही आपण पाहीले आहे, आता आपण या सेंद्रिय कार्बन  चे नेमके काम काय असते व तो कसा असतो हे पाहणार आहोत. सेंद्रिय कार्बन जमिनीत स्थिर झाल्यावरच त्याचे चे रुपांतरण ह्युमस मधे होते , ह्युमस हा एक काळपट रंगाचा व मेणचट पदार्थ असतो, या पदार्थाचे रासायनिक पृथ्थकरण केल्यास यात 60 % सेंद्रिय घटक व 6% नत्राचे प्रमाण सापडते, तसेच यात पाणी व एतरही अनेक खणीजे व संप्रेरके सापडतात, हे प्रामुख्याने कार्बन डाय ऑक्साईड व नायट्रोजन चेच एक संयुग तयार झालेले असते, याचे उत्कृष्ट  प्रमाण गुणोत्तर 10 : 1 असे समजतात. यालाच कर्ब नत्र गुणोत्तर किंवा सी एन रेशो असे म्हणतात. हा पदार्थ म्हणजे पिकाचे थेट अन्न असते  असा अनेकांचा समज आसतो,  परंतु ह्युमस हे वनस्पती चे अन्न बिलकूल नसते, वनस्पती ची मुळे या पदार्थाला कधिच स्विकारत नाही, नव्हे ते मुळीला ऊचलताच येत नाही. ह्युमस हा एक पौष्टिक असा प्रथिनजन्य पदार्थ आहे, त्यामुळे हा पदार्थ जमिनीत असणार्या असंख्य जिवाणूंचे खाद्य आहे, मातीतील विविध कामे करणारे जिवाणू हे अतिशय सुक्ष्म आकाराचे असतात व ते फक्त प्रथिनजन्य  पदार्थावरच जगतात व वेगाने वाढतात. (मुळताच मातीत हे जिवाणू पहिलेच नैसर्गिक असतात) जर जमिनीचा सेंद्रिय कार्बन 0.80 % किंवा त्यापेक्षा अघिक असल्यास हेच जिवाणू भयानक वेगाने वाढतात, वाढतात म्हणजे एकाचे दोन, दोनचे चार, चारचे आठ.. योग्य अनुकुलता मिळाल्यास एक जिवाणू एक महिण्यात स्वताची पुढिल पिढी ची संख्या एक कोटीच्या पुढे नेऊ शकतो, आता एका एकरात सगळे मिळून किती जिवाणू संख्या असते हे मात्र विचारू नका! (गणित च करता येनार नाही म्हणून अगणित) आता हेच जिवाणू काय काय काम करतात ते आपण पाठीमागील एका भागात पाहिल आहे, अनेक बागाईतदार शेतकर्याना असे वाटत असावे आपण पिकाला दिलेली वेगवेगळी खते, डिएपी, पोटॅश किंवा अलीकडील पाण्यात विरघळणारी रासायनिक खते शंभर टक्के पाण्यात विरघळली की पिकाची मुळे सरळ ऊचलत असतील परंतु कोनत्याच वनस्पती ची मुळे रासायनिक किंवा सेंद्रिय खतांना थेट कधिच ऊचलु शकत नाहीत, तर ही विविध  खते सुट्या सुट्या आयण कणांना च स्वतः ऊचलु शकतात, समजा आपण एखाद्या पिकाला कॅल्शियम नायट्रेट ( Ca(NO3)2 ) पाण्यात पुर्णपणे विरघळून दिले,  ते जमिनीत पोहोचल्या बरोबर मातीत असणारे अगणित जिवाणू या द्रव कणांवर लगेच प्रक्रिया करतात व कॅल्शियम चे व नायट्रेट चे वेगवेगळे आयन्स मुक्त करतात. मगच मुळे ते वेगवेगळ्या स्वरूपात ऊचलून घेतात व वर खोडाकडे पाठवतात, एकंदरीत वनस्पती ची मुळे स्वतःचे अन्न हे फक्त आयण च्याच स्वरुपात घेतात, शेतकरी एखादे कोनतेही रासायनिक खत दिल्यानंतर पिकावर या खताचा होणारा परिणाम दोन तिन किंवा काही दिवसातच पहायला मिळतो, या वरून कल्पना येईल की या काळात जमिनीत किती प्रचंड व वेगाने जिवाणूं ची हालचाल असेल, आणि हेच जिवाणू मात्र सेंद्रिय कार्बन वरच जगतात, या साठी जमिनीत विविध जिवाणूंची ऊपलब्धता असणे अत्यंत गरजेचे आहे, व या जिवाणू ना जगण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कार्बन भरपूर असने हे फार महत्वाचे आहे. कोनतीच खते ही मुक्त आयण स्वरूपात नसतात, त्यावर जिवाणूं कडून प्रक्रिया च व्हावी लागते, पिकांची मुळे ही आपण जे कोनतेही सेंद्रिय अथवा रासायनिक खत दिले म्हणजे त्या खतांचे सर्वच आयन्स घेते असे नाही, तर पिकाला जे गरजेचे आयन्स हवे तेच ते ऊचलुन घेते. मग न घेतलेले आयन्स तसेच काही काळ जमिनीत साठून राहतात व पुढे दुसर्या कुठल्यातरी विजातीय आयन्स बरोबर संयोग होऊन नविन प्रकारचे संयुग तयार होते, असे पिकाकडून न स्विकारलेली व नैसर्गिक प्रक्रियेत तयार झालेली संयुगावस्थेतील संयुगे असंख्य प्रकारची असतात, यात बरीचशी संयुगे ही विकृत (विषारी व प्रचंड आम्लारी किंवा अल्कली युक्त) असतात,  यावर जिवाणू सुद्धा प्रक्रिया करू शकत नाहीत व अनेकदा जिवाणू मरतात किंवा या जिवाणूंची संख्या कमालीची घटते. द्राक्ष वेली च्या मुळांवर अशी ऊपलब्ध न होणारी संयुगे साठून राहतात व मुळांवर निगेटिव्ह चार्ज वाढवतात . हा निगेटिव्ह चार्ज वेलीच्या वाढीच्या (विश्रांती) काळात ठीक आहे परंतु फळाच्या वाढी वेळेस वेलीचे संतुलन बिघडवत असतो. या वरून आपणास समजले असेलच की द्राक्ष वेलीस कधि व कोनती खते किती द्यावित म्हणजे द्राक्ष वेलीवर कोनत्यावेळी कोनता चार्ज असायला हवा त्यानुसारच कोनती खते कधि व किती द्यावित हे नियोजन करणे सोपे होऊन जाईल. आपण पुढील काही भागात हेच पहाणार आहोत.  

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्