द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग १२

Posted Date - 26-09-2019

सेंद्रिय कार्बन निर्मिती मधे सेंद्रिय घटक व विविध जिवाणू या दोन घटकांच्या संयोगाची गरज असते.  या शिवाय त्या ठिकाणच्या भौतिक परिस्थितीची ही एक विशिष्ट अवस्था ही असावी लागते, सेंद्रिय कार्बन तयार होत असताना ऑक्सिजन चा  इंधन म्हणून उपयोग होत असतो, जमिनीत सेंद्रिय कार्बन चांगला म्हणजे एक टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास मातीचे तपमान संतुलित राहते, ज्या जमिनीत हाच सेंद्रिय कार्बन कमी (0.5 % पेक्षा कमी) असल्यास हवेतील तपमान जमिनीवर प्रभाव पाडत असते, अश्या जमिनी थंड हवामानात वेगाने हवेतील तपमानाला समकक्ष होतात व जास्त तापमानात लवकर तापतात. या ऊलट जमिनीत  भरपूर ( 1% च्या आसपास किंवा जास्त) असताना हवेतील कमी किंवा जास्त तपमानाचा जमिनीवर लवकर परिणाम होत नाही. द्राक्ष वेलीच्या चांगली वाढ व विकासासाठी 15 ते 35 अंश डिग्री सेल्सियस तपमान चांगले मानवते, 35 पेक्षा जास्त तपमानाचा द्राक्ष वेलीची  वाढ मंदावते, मुळे अन्नद्रव्ये व पाणी ऊचलण्यास कमी पडतात व 15 डिग्री पेक्षा ही तसेच परिणाम वेलीवर होतात,  परंतु हेच तपमान जर 15 डिग्री पेक्षा फारच कमी म्हणजे  12-11-10 किंवा 10 च्या खाली आल्यावर मात्र द्राक्ष वेलीवर विपरित परिणाम होऊ लागतात, अतिशय कमी तापमानामुळे द्राक्ष पाने कडक व वाकडी होतात प्रसंगी पानांच्या कडा करपतात व घड अवस्था असताना घडांचा विकास थांबतो. मण्यावरिल बाह्य  त्वचेच्या पेशी आकसतात व घडामधा कडकपणा येतो, अनेकदा ऊशिरा फळछाटणी च्या बागांमधे घड सेटिंग अवस्था येते व तापमान  प्रचंड घसरते (15 डिग्री पेक्षा कमी ) अश्या वेळी हमखास घडामधे कडकपणा जानवतो, परंतु याच वेळी जमिनीत सेंद्रिय कार्बन भरपूर असल्यास वेलींच्या मुळावर निगेटिव्ह चार्ज सक्रिय ठेवायचे काम हाच सेंद्रिय कार्बन करत असतो व स्वाभाविकच मुळांचे तपमान हवेतील तापमानापेक्षा  जास्त राहते व त्याही अवस्थेत द्राक्ष वेलीची मुळे कार्यक्षम राहतात व घडाना ऊर्जा पुरवतात परिणाम घडावरील मणी व देठ फारसे कडक होत नाहीत. तथापि द्राक्ष घडात  कडकपणा येण्याचे कमी तपमान हे एकच कारण नसते,  मोहोर फुलोरा  अवस्थेत कॅल्शियम, झिंक व पोटॅशियम या घटकांची कमतरता ही घड कडक बनविण्यास कारणीभूत  असते, जमिन चुनखडीयुक असल्यास याच काळात मॅग्नेशियम, फेरस ची विशेष कमतरता जानवते, काही वेळेस फुलोरा अवस्था येण्यापूर्वी जिए चा वापर दहा पीपीएम पेक्षा जास्त झाल्यास हमखास झिंक द्रव्याची कमतरता येते व घड जिरने, बाळी पडने व वाचलेल्या घडामघे कडकपणा हमखास येतो, कॅल्शियम च्या अतीवापराने  सुद्धा घड कडक बनतात या शिवाय फवारणी चे  पाणी अती क्षारयुक व जास्त पिएच चे सतत वापरले असल्यासही घडाना कडकपणा येतो, शक्यतो फवारणी चे पाणी विहिरीचे वापरावे, बोअर व सरळ कॅनाॅलचे पाणी जास्त क्षारयुक असते, जास्त पिएच साठी पिएच बॅलंसर सारखे घटक वापरावेत,पाणाचा पिएच कमी करण्यासाठी  सतत सायट्रिक अॅसिडचा  वापरही मण्यांना कडक बनवते, काही वेळेस बागेस पाण्याचा वापर एकसारखा न होता कमी जास्त होतो त्याही परिस्थितीत घडाना कडकपणा येऊ शकतो, कोनत्याही कारणामुळे  घडाना आलेला कडकपणा कमी करण्यासाठी एसव्हि किटोन चा द्राक्ष बागेत वापर करणे अतिशय फायदेशीर ठरले आहे, यातील नैसर्गिक अमिनो आम्ल, नैसर्गिक जिबरेलन्स व नैसर्गिक सायटोकायनिन्स ची संयुगे अतिशय खुबिने द्राक्ष बागेत काम करतात, घड सेटिंग नंतर घडांना कडक होण्यापासून वाचवितात. एसव्हि किटोन फवारणी नंतर अतिशय कमी वेळात घड नरम व कुरकुरीत अवस्थेत टिकून राहतात. जास्त थंडीच्या वातावरणात एकरी एक लिटर जमिनीतून दिल्यास ही ते घडाना सहसा कडक होण्यापासून वाचविते. 

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्