द्राक्ष वेल व निगेटिव्ह चार्ज: भाग ९ 

Posted Date - 26-09-2019

जमिनीची सुपिकता ही सेंद्रिय कार्बन वर बरिचशी अवलंबून आहे हे आपण समजून घेतले आहे, अत्यंत वेगवान पद्धतीने सेंद्रिय कार्बन चे प्रमाण कसे वाढविता येईल ते आपण आता पाहणार आहोत, सर्वात महत्वाचे म्हणजे या प्रयोगात भरपूर कार्बनिक पदार्थ (सेंद्रिय  घटक) जमिनीत मिसळून टाकने गरजेचे आहे, (या घटकांमधे भरपूर विविध प्रकारचे  जिवाणू असतात) हे सेंद्रिय घटक जमिनीत मिसळल्या नंतर मात्र जमिनीची  फारशी कोणत्याही प्रकारची मशागत करू नये आणि मग त्याच जमिनीच्या पृष्ठभागावर एक सारखे सेंद्रिय  पाला पाचोळा, पिकांचे अवशेष, थोडेसे काष्ठयुक (मका ची धांडे, तुराट्या , कपाशीच्या काड्या किंवा इतर  घटक) तण वैगरेचे आच्छादन (मल्चिंग) करून घ्यावे, आता मातीत मिसळलेले सेंद्रिय घटक जिवाणूंच्या मदतिने कुजण्याची प्रक्रिया चालु करतिल (सडण्याची नव्हे). या कुजन्याच्या प्रक्रिये दरम्यान तयार झालेली उष्णता सेंद्रिय आच्छादना मुळे नियंत्रणात ठेवली जाईल,  ईथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे,  बिगर आच्छादित सेंद्रिय घटक कुजण्याच्या प्रक्रियेत तयार झालेली ऊर्जा नियंत्रित रहात नाही या ऊर्जे पासून मुख्य पिकांची मुळे दुर पळतात, शिवाय या ऊर्जे मुळे काही नैसर्गिक अन्नघटकांचा र्हास होतो, कारण ऊर्जा म्हणजे च ऊष्णता किंवा अग्नी होय, आणि ऊर्जा कुठपर्यंत टिकते तर जो पर्यंत या ऊर्जे ला इंधन पुरवठा होतो तो पर्यंत ही ऊर्जा  टिकून रहाते, नेमके ईथेही असेच घडते, जमिनीत सेंद्रिय घटकांची कुजण्याच्या प्रक्रियेत  (विना आच्छादित) मुळताच जमिनीत असलेले नायट्रोजन,  ऑक्सिजन हे घटक इंधनाचे काम करतात,  यातून तयार झालेला कार्बन डाय ऑक्साईड हवेत उडून जातो (यालाच म्हणतात तेलही गेले अन तुपही गेले,  हाती आले...) परंतु  जर याच स्थितीला जमिनीवर परत सेंद्रिय घटकांचे आच्छादन असेल तर नेमके याच्या ऊलटे घडते, जमिनीत ऊर्जा अल्प प्रमाणातच तयार होते, नत्र ऑक्सिजन जे फारसे ज्वलन होत नाही, मोठ्या प्रमाणात तयार झालेला कार्बन डाय ऑक्साईड आच्छादना मुळे अडून जमिनीतच मुरतो, या शिवाय याच वेळी त्या जमिनीत असणारे पिक प्रकाशसंश्लेषन वेगाने करते,  व जमिनीत कार्बन डाय ऑक्साईड चे मुरण्याचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनीत असणार्या सेंद्रिय घटकांचे ह्युमस मध्ये रूपांतर होते. (हे नेमके कसे घडते याचे ऊत्तम ऊदाहरण च सांगतो, चांगली वाळलेली लाकडे व गोवर्या  होळी सणाला आपल्याकडे आणून जमिनीच्या वर व हवेच्या सानिध्यात पेटविली जातात दुसर्या दिवसी जाऊन पाहिले तर सगळ्या ची राख झालेली असते,  या राखेत ऊर्जा शिल्लक राहत नाही,  आता हिच लाकडे जमिनी खाली भट्टीत जाळली तर या लाकडांची  राख न बनता ऊत्तम लोणारी कोळसा तयार होतो, या कोळश्यात भरपूर ऊर्जा शिल्लक राहिलेली असते) हाच ह्युमस पुढे जमिनीत असणार्या जिवाणूंना व पिकाला नवसंजीवनी प्राप्त करून देतो. हाच जमिनीत स्थिरावलेला कार्बन पिकाना हवि तशी ऊर्जा पुरवत राहतो, या सगळ्या प्रक्रियेत मातीत असणारे जिवाणू मात्र महत्वाची कार्ये सांभाळत असतात , हे जिवाणू फक्त सेंद्रिय घटकांना कुजविने एवडच कार्य करत नाहीत तर मातित असणारी विविध  प्रकारची खनिजे पिकांना सहज ऊपलब्ध करून देत असतात, हे विविध जिवाणू नेमके काय काय करतात हे आपण पुढे पाहणारच आहोत, परंतु सेंद्रिय कर्ब वाढविणे हे अतिशय महत्वाचे असणार आहे, जमिनीत तयार झालेला ह्युमस ( ह्युमिक अॅसिड नव्हे ) हाच द्राक्ष वेलींच्या मुळांवर असणारा निगेटिव्ह चार्ज नियंत्रित करू शकतो हे आता आपल्याला समजु शकेन.

लेखक-
मा.श्री.सुभाषचंद्र कराळे सर
संचालक, एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स्