एस व्हि अॅग्रो सोल्यूशन्स प्रा.लि. २०१० वर्षांपासून सतत कृषी क्षेत्रामध्ये संशोधन व शेतमाल उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहे. याशिवाय कमीत कमी खर्चा मध्ये जास्तीत जास्त वजनाचे व निरोगी विषमुक्त फळे ,भाज्या आणि धान्य पिके उत्पादनासाठी प्रयत्न करत आहे. यातूनच निर्माण झाली एस व्हि अग्रो सोल्युशन ही संस्था . शेतकरी बंधूना आपल्या पिकासाठी लागणारे सर्व प्रकारचे द्रव्य उपलब्ध असतात, परंतु ती योग्य वेळी पिकांना उपलब्ध होत नाही. अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जिवाणू पर्यावरणात कमी अधिक प्रमाणात असतात. परंतु जिवाणूंना वाढीसाठी लागणारे वातावरण व जीवन वाढीसाठी पूरक घटक यांचापुरवठा केल्यास मातीमध्ये उपयोगी जिवाणू भरमसाठ वाढतात व ते पिकांना लागणारे अन्नघटक उपलब्ध करून देतात. पर्यायाने पिकांचे उत्पादन वाढते व दर्जा सुधारतो म्हणूनच आम्ही घेऊन येत आहोत. पूर्णपणे घटकांवर आधारित उत्पादनांची शृंखला.
कृषिप्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात 140 कोटी लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी आपले शेतकरी बांधव दिवस रात्र झटत असतात. बदलते हवामान, अपुरे कृषी निविष्ठा ,दुष्काळ, सेंद्रिय घटकांचा तुटवडा अश्या अनेक समस्या सोडवत आपले शेतकरी अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी सतत धडपडत असतात .जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या नादात शेतकरी बांधव आपल्या शेतात व पिकांवर भरमसाठ रसायनांचा मारा करतात. अनेक विषारी व रासायनिक घटक यासाठी वापरले जातात.त्यामुळे आपल्या मातीचे आरोग्य तर बिघडलेच आहे व या घातक रसायनांमुळे आपण पिकवलेला भाजीपाला ,फळे , अन्नधान्य इत्यादी दूषित होत आहेत या दूषित झालेल्या अन्नामुळे लोकांचे आरोग्यही मोठ्या प्रमाणात बिघडले आहे. याशिवाय अनेक प्रकारच्या रसायनांचा अंश फळे व भाज्या निर्यातीमध्ये सतत नाकारली जातात.खर्च करून पिकवलेला माल दर्जेदार असूनही आपल्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागते.सततच्या बेसुमार वापरलेल्या रासायनिक घटकांमुळे आपली माती क्षारयुक्त होत आहे व आता कितीही रासायनिक खते टाकली तरी उत्पादनात फारसा फरक पडत नाही.पिकांची प्रतिकारक्षमता ही नष्ट झाली आहे. त्यामुळे कीड व रोग पिकांना सोडत नाही.पर्यायाने पिकांच्या कीड व रोग नियंत्रणासाठी सारखा-सारखा खर्च करावा लागतो. गेल्या पंधरा ते वीस वर्षांच्या तुलनेत आता मात्र अनेक पटीने खते व औषधांच्या फवारण्या लागतात. परंतु उत्पादनात मात्र फारशी वाढ झालेली पाहायला मिळत नाही.एस व्ही ऍग्रो सोल्युशन आपल्यासाठी घेऊन येत आहे एक अनोखे कृषी तंत्रज्ञान आणि ते म्हणजे एस इको नॅनोटेक्नॉलॉजी म्हणजेच पर्यावरण पूरक कृषी उत्पादन तंत्रज्ञान होय.या तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादन खर्च कमी होऊन पिकांच्या मुख्य उत्पादनात भरमसाठ वाढ होते. याशिवाय आपली फळे भाजीपाला व इतर अन्नधान्य ही रसायनमुक्त होतात. फळाचा व सर्व प्रकारच्या शेती मालाचा दर्जा चांगला सुधारला जातो .एक्सपोर्ट कॉलिटी चांगला दर्जा मिळाल्यामुळे आपल्या मालाला बाजारभाव चांगला मिळतो.
अनुभव - सन १९९४ पासून शेतीक्षेत्रात कार्यरत , कृषी शिक्षण, डाळिंब , द्राक्ष व इतर फळपिके सल्लागार , सेंद्रिय फळबाग तज्ञ् .
कृषीप्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या भारत देशात आज आपला शेतकरीच पोरका होत चाललाय. कोटी लोकसंख्येचे पोट भरता- भरता आपला शेतकरी राजाच उपाशी राहू लागलाय. गेल्या २० वर्षात एकट्या महाराष्ट्रात ३ लाख शेतकरी बंधूनी आत्महत्या केलाय आहेत. आणि याच मुख्य कारण जमिनीची नापिकी आहे. रासायनिक शेती पद्धतीतीमुळे तर जमीन नापिक झालीच परंतु याच रसायनांमुळे सर्वच जनतेचं आरोग्यही धोक्यात आले आहे. अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी अतिरिक्त रसायनांचा वापर वाढला आहे. परिणामी जमिनी क्षारयुक्त व कडक झाल्या आहेत. पिकावर सुद्धा रोग व किडीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शेतमाल आता दर्जाहीन व उत्पादन कमी होत आहे.
गेल्या २० वर्षात जमिनीची होत गेलेली स्थिती तर पाहत आलो आहे. हि परिस्थिती वेगाने बदलणे गरजेचेच आहे. जगातील अनेक देशांनी आपल्या शेती पद्धती मधून मानवी आरोग्यास घातक असलेली रसायने हद्दपार केली आहेत . चांगली शेंद्रीय शेती पद्धती (तंत्रज्ञान) विकसित झाली तरच हि परिस्तिथी बदलता येणे शक्य होईल. हा विचार करून करूंन गेल्या १० वर्षात आम्ही संशोधित एसव्हि इको नॅनो तंत्रज्ञान विकसित करण्यात यशस्वी झालो आहोत. १००% शेंद्रीय शेती निविष्ठा स्वतः निर्माण करत आहोत. आता रसायनांचा कमीत कमी वापर करून उत्कृष्ट दर्जाजचे निर्यातक्षम उत्पादन घेणे सहज सोपे झाले आहे. आमची , एसव्हि अग्रो सोल्युशन्स हि कपंनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व काळी आई वाचण्यासाठी अभियानांमध्ये अर्थात कृषक हिताय मृदा संवर्धनाय सतत शेतकऱ्यांसोबत कटिबद्ध आहे.
अनुभव - शेतीविषयक २००३ साला पासून फळबाग व ऊस (कॅन्सल्टिंग ) शेतकरी मार्दर्शक व सेंद्रिय शेती तज्ञ्.
शेतीविषयक आवड निर्माण झाली ती २००३ मध्ये एका इनेटरनॅशनल कंपनीचे व्याख्याते श्री. बोराडे साहेब यांच्या मार्गदर्शनातून सध्याची शेतीविषयक परिस्थिती, वातावरणात शेती करण्याची पद्धत व तयार होणारे अन्न या विषयी माहिती मिळाल्या नंतर असं वाटल कि आपल्या काळ्या आईची सेवा करण्यासाठी आपण जन्म घेतला आहे. सेंद्रिय उत्पादन तयार करण्यासाठी कराळे साहेब याना भेटून २०१० पासून ते २०१५ पर्यंत संशोधन केले . एक उद्दिष्ट हाती घेतले . ते म्हणजे कृषक हिताय मृदा संवर्धनाय.
अनुभव - सर्वक्षेत्रातील मार्केटींग विभागातील १५ वर्षाचा अनुभव (सेद्रीय शेती विषयक आवड)
मार्केटींग विषयांची लहानपणापासूनच आवड २००३ साली प्रॉडक्ट मीटिंगमध्ये कामाला सुरुवात, २०१९ मध्ये २००९ मध्ये कराळे साहेब व करे साहेब यांची भेट व त्या भेटीतून शेतकऱ्यांना भविष्यात शेतीविषयक निर्माण होणाऱ्या अडचणींवरती मार्ग काढण्यासाठी शिक्रापूर मध्ये १ मी मिटिंग व संशोधनाला सुरुवात.
एसव्हि अग्रो सोल्युशन्सची निर्मिती केली कृषक हिताय मृदा संवर्धनाय या कंपनीच्या ब्रिदवाक्यावरती कंपनीची सुरुवात. शेतकऱ्यांच्या सेवार्थ व काळ्या आईला वाचवण्यासाठी करण्यात आली. कंपनीने सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी मार्केटिंग क्षेत्रात कंपनीचे आउटलेट स्वरूपात एक सुवर्ण संधी निर्माण केली आहे व त्यातूनच बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली अशा हजारो लोकांना भविष्यात रॊजगाराची संधी निर्माण करून देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
अनुभव -ऊस, केली, डाळिंब या पिकांमध्ये २००७ सालापासून शेतकरी मार्गदर्शन (सेंद्रिय शेती विषयक आवड)
सध्याचे कृषी क्षेत्रातील बदलते हवामान व पारंपरिक शेती यात बदल करून आधुनिक शेती तसेच शेतकऱ्यांच्या विकासासाठी सेंद्रिय शेतीचे महत्त्व व शेतमाल निर्यात करण्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता व शेतीच्या विकास प्रणालीचा या बदलत्या प्रवाहानुसार बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे व त्या बद्दलची अमलबजावणी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना प्रबोधन करून त्या नुसार कार्य करत राहणे हेच आमचे कर्तव्य आहे व त्यासाठी आम्ही एकनिष्ठ आहोंत.